प्रशासनाने दिव्यांगांचे हात पाय डोळे व्हावे, बच्चू कडू यांची अपेक्षा
By समीर देशपांडे | Published: August 25, 2023 04:46 PM2023-08-25T16:46:46+5:302023-08-25T16:49:24+5:30
दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने आयोजित दिव्यांगांच्या दारी अभियान कार्यक्रमात ते बोलत होते.
कोल्हापूर : ज्यांना पाय नाहीत त्यांचे प्रशासनाने पाय व्हा, ज्यांना हात नाहीत ,त्यांचे हात व्हावे आणि ज्यांना डोळे नाहीत प्रशासनाने त्यांचे डोळे व्हावेत अशी अपेक्षा दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली. दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने आयोजित दिव्यांगांच्या दारी अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला दिव्यांग बंधू-भगिनींनी प्रचंड गर्दी केली होती.
बच्चू कडू म्हणाले, गेली पंधरा वर्षे दिव्यांगांच्या विविध प्रश्नांसाठी आम्ही संघर्ष करत आलो आणि या संघर्षाचे फलित म्हणजे आज सर्व प्रशासनच दिव्यांगांच्या दारी आम्ही घेऊन आलो आहोत. या सगळ्या योजनांचा लाभ दिव्यांग बंधू-भगिनी घ्यावा.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, महापालिकेच्या आयुक्त के मंजूलक्ष्मी इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.