जिल्हा परिषद ‘काम बंद’ आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 12:44 AM2017-08-03T00:44:22+5:302017-08-03T00:44:25+5:30

Back to the Zilla Parishad 'Work Stop' movement | जिल्हा परिषद ‘काम बंद’ आंदोलन मागे

जिल्हा परिषद ‘काम बंद’ आंदोलन मागे

Next
ठळक मुद्देकर्मचारी काळ्या फिती लावून कामावर रुजू होणार


लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील बाराही पंचायत समित्यांच्या कर्मचाºयांनी बुधवारी दुपारी काम बंद आंदोलन मागे घेतले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी सकाळी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाºयांशी
त्यांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा करून त्यांना आंदोलन मागे
घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार आज, गुरुवारपासून कर्मचारी काळ्या फिती लावून कामावर रुजू होणार आहेत.
करवीर पंचायत समितीचे कनिष्ठ सहायक बाळकृष्ण गुरव यांनी रविवारी (दि. ३०) आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यामध्ये त्यांचा सोमवारी मृत्यू झाला. ‘झिरो पेंडन्सी’च्या कामाच्या अतिताणामुळे गुरव यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कर्मचाºयांनी केला होता. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाºयांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली होती. मात्र चौकशीशिवाय असा गुन्हा दाखल करण्यात येत नसल्याचे पोलीस अधिकाºयांनी स्पष्ट केले होते.
हा प्रश्न अधिवेशनामध्ये उपस्थित केल्यानंतर संबंधित अधिकाºयांची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी (दि. ३१) दिले होते. याबाबत मंगळवारी (दि. १) जिल्हा परिषदेला पत्र प्राप्त झाले. त्यानुसार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्र्रजित देशमुख यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्तीही करण्यात आली. मंगळवारी कर्मचाºयांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेऊन त्यांनाही मागण्यांचे निवेदन दिले होते. मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकाºयांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र याबाबत निर्णय झाला नव्हता.
बुधवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावले होते. यावेळी तुमच्या सविस्तर मागण्या घेऊन या; त्यावर चर्चा करू, असे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार या कर्मचारी संघटना प्रतिनिधींनी सहा मागण्यांचे निवेदन महाडिक यांना दिले व त्यांच्याशी याबाबत सकारात्मक चर्चा केली.
दुपारी दोनच्या सुमारास अध्यक्षा महाडिक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील-कळेकर, शिक्षण सभापती अंबरीशसिंह घाटगे, बांधकाम सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर, महिला व बालकल्याण सभापती शुभांगी शिंदे, गटनेते अरुण इंगवले यांनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी शौमिका महाडिक म्हणाल्या, बाळकृष्ण गुरव यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर कर्मचाºयांच्या मनातील भावना आम्हांला समजल्या आहेत. कर्मचाºयांच्या प्रश्नांबाबत आम्ही यापुढील काळात दक्ष राहू. कोणत्याही परिस्थितीत कर्मचाºयांवर अन्याय होऊ नये यासाठी पदाधिकारी दक्षता घेतील. मात्र घटनेनंतर दोन दिवस जिल्हाभर कामकाज ठप्प आहे. त्यामुळे जनतेची अडचण नको. तेव्हा हे आंदोलन मागे घ्यावे, अशी माझी विनंती आहे.
यावेळी संघटनेच्या पदाधिकाºयांनी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. मात्र जोपर्यंत उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांचे निलंबन होत नाही, तोपर्यंत काळ्या फिती लावून काम सुरू राहील, अशी घोषणा यावेळी करण्यात आली.
सचिन जाधव, अजित मगदूम, धनंजय जाधव, जितेंद्र वसगडे, अजय शिंदे, दत्तात्रय केळकर, सुरेश पाटील, अशोक पाटील, एन. के. कुंभार, साताप्पा मोहिते, के. आर. किरूळकर, एस. डी. पाटील, डॉ. शहाजी पाटील, दीपक साठे, रमेश सातपुते, सुभाष इंदुलकर, सुरेश डवरी, सुधाकर कांबळे, संतोष भोसले, सुरेश कदम तसेच महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सचिन मगर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
कर्मचाºयांच्या मागण्या
1उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांना जिल्हा परिषदेत हजर करून घेऊ नये व त्यांच्यावरील कारवाईसाठी प्रयत्न व्हावेत.
2जिल्हा परिषद व तालुकास्तरावरील निलंबनांचा पुनर्विचार व्हावा.
3आंदोलनात सहभागी कर्मचाºयांवर अधिकाºयांनी आकसापोटी कारवाई करू नये.
4सर्व अधिकाºयांनी कर्मचाºयांना चांगल्या प्रकारची वागणूक द्यावी.
5वर्ग ४ सह अन्य कर्मचाºयांना कोणतेही अशासकीय काम लावू नये; तसेच शासकीय वेळेव्यतिरिक्त जादा वेळ थांबण्यास जबरदस्ती करू नये.
6अभिलेख वर्गीकरण व ‘झिरो पेंडन्सी’कामासाठी जबरदस्ती न करता त्यासाठी मुदतही ठरवू नये.

Web Title: Back to the Zilla Parishad 'Work Stop' movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.