आडसाली ऊसक्षेत्राकडे अल्पभूधारक शेतकऱ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:32 AM2021-06-16T04:32:15+5:302021-06-16T04:32:15+5:30
शिवराज लोंढे लोकमत न्यूज नेटवर्क सावरवाडी : वाढत्या महागाईच्या काळात आडसाली उसातून उत्पादन घटू लागल्याने आडसाली ऊसशेतीचे क्षेत्र कमी ...
शिवराज लोंढे
लोकमत न्यूज नेटवर्क
सावरवाडी : वाढत्या महागाईच्या काळात आडसाली उसातून उत्पादन घटू लागल्याने आडसाली ऊसशेतीचे क्षेत्र कमी होत आहे. एकीकडे साखर कारखाने आडसाली उसाची उचल नियोजित गळीत हंगामात करीत नाहीत, तर दुसरीकडे ऊसतोडणी मजुरांकडून होणारी लूट ??????? उसाची उचल १८ ते १९ महिन्यांनी होत असते. परिणामी आडसाली ऊस उत्पादनात घट होते. कोल्हापूर जिल्ह्यात द्वितीय पीक घेण्याच्या पद्धतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे . यंदापासूनच आडसाली ऊस क्षेत्राकडे बहुतांश अल्पभूधारक शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. आडसाली ऊस लागणीऐवजी भात शेतीला पसंती अधिक आहे
ऊस शेतीच्या वाढत्या खर्चाचा मेळ घालणे कठीण होते. डिझेल-पेट्रोल या इंधन दरवाढीचा चांगलाच आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. ट्रॅक्टर मशागतीच्या दरात प्रचंड वाढ झाली, रासायनिक खतांची दरवाढ, नियोजित हंगामानुसार खतांच्या टंचाईचा परिणाम शेती व्यवसायाला बसतो. ग्रामीण भागातील पाणी पुरवठा संस्थांच्या वाढीव पाणीपट्टीची आकारणी न परवडणारी बनली आहे. शेतमजुरांच्या मजुरांची वाढलेली दरवाढ, मशागतीचा खर्च वाढल्याने आडसाली ऊस उत्पादक शेतकरी दिवसेंदिवस अडचणीत येत आहे.
साखर कारखान्यांकडून ऊसतोडणीचे नियोजनात्मक कामकाज होत नाही. आडसाली उसाचे पीक १८ ते १९ महिने उभे ऊस पीक शेतात असते. त्याचा परिणाम शेतक-यांच्या अर्थकारणावर होतो. १९ महिन्यांच्या ऊस पिकातून वजनात घट होते. उत्पादन खर्च अधिक नफा यांचा मेळ बसत नाही. आडसाली ऊस पीक हे गरीब व मध्यम शेतकऱ्यांना सध्या महागाईच्या काळात परवडत नाही.
ग्रामीण भागात भात पिकाचे जून ते ऑक्टोबर, नोव्हेंबर, महिन्यामध्ये उत्पादन घेतले जाते. त्यानंतर लगेच ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यातच ऊस लागणी केल्या जातात. भाताच्या लागणीच्या क्षेत्रात मका, झेंडू, कांदा, वांगी, लसूण, दोडका, मुळा इतर भाजीपाला यासारख्या अंतर पिके शेतकरी घेतात. या पिकातून शेतकऱ्यांना जादा आर्थिक नफाही मिळतो. भात पीक घेतल्यानंतर पुढे लागणीचा ऊस इतर साखर कारखान्यांना एका वर्षाच्या आत घालविला जातो आणि उत्पन्नही जादा मिळते, असा विचार नव्या बदलत्या काळात शेतकरी करू लागला आहे. म्हणून भात शेतीकडे अल्पभूधारक शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे .
खरीप पिकांच्या उत्पादनाकडे कल
कोरोनाच्या महामारीच्या काळात होणारी अन्नधान्य टंचाई, तसेच खाद्यतेलाचे भडकलेले दर, वाढती महागाई यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. खरीप पिकांच्या उत्पादनात धान्य मिळते.
कोट
आडसाली उसाची उचल वेळेवर होत नाही. साखर कारखान्यांचा चुकीच्या धोरणामुळे आडसाली ऊस क्षेत्राची वेळेत उचल होत नाही. १८ ते १९ महिने ऊस उभे पीक असल्यामुळे वजनात घट होते. एकरी १५ ते १७ हजार रुपयांचा तोटा होतो. याला साखर कारखानदार जबाबदार आहे.
दिनकर सूर्यवंशी (शेतकरी, कसबा बीड)
फोटो ओळ -१५ कसबा बीड
सध्या वाढत्या महागाईच्या काळात आडसाली ऊस क्षेत्र घटू लागण्याने ग्रामीण भागात खरीप हंगामातील भात पीकांच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे .