Ganesh Mahotsav -खराब रस्त्याचे प्रतिबिंब देखाव्यामध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 12:04 PM2019-09-07T12:04:24+5:302019-09-07T12:50:25+5:30

कोल्हापुरातील खराब रस्त्याचे प्रतिबिंब यंदाच्या गणेशोत्सवात दिसत आहे. बेलबाग येथील रहिवाशी नितीन विनायक मिरजकर यांनी घरातील गणेशमूर्तीसमोर फायबरचा फिरता रोड रोलर तयार करून खराब रस्त्यावर खडीकरण सुरू असल्याचा देखावा केला आहे.

Bad road reflection | Ganesh Mahotsav -खराब रस्त्याचे प्रतिबिंब देखाव्यामध्ये

Ganesh Mahotsav -खराब रस्त्याचे प्रतिबिंब देखाव्यामध्ये

Next
ठळक मुद्देखराब रस्त्याचे प्रतिबिंब देखाव्यामध्येनितीन मिरजकर यांचा फिरता रोड रोलर

संदीप आडनाईक

कोल्हापूर : कोल्हापुरातील खराब रस्त्याचे प्रतिबिंब यंदाच्या गणेशोत्सवात दिसत आहे. बेलबाग येथील रहिवाशी नितीन विनायक मिरजकर यांनी घरातील गणेशमूर्तीसमोर फायबरचा फिरता रोड रोलर तयार करून खराब रस्त्यावर खडीकरण सुरू असल्याचा देखावा केला आहे.

मेकॅनिक डिप्लोमाचे शिक्षण घेतलेले नितिन मिरजकर हे कळंबा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत फीटर ट्रेडसाठी शिक्षक आहेत. दरवर्षी ते घरातील गणपतीसमोर वेगवेगळे तांत्रिक देखावे केवळ हौसेसाठी तयार करत असतात. पावसामुळे कोल्हापुरातील रस्ते खराब झाल्याचे प्रतिबिंब यावेळच्या देखाव्यात दाखविण्याचे त्यांनी ठरविले.

फॅब्रिकेशन आणि बायोफोमच्या साहाय्याने त्यांनी फिरता रोड रोलर तयार केला. गेले १५ दिवस यासाठी ते परिश्रम घेत होते. घरातील गणेशमूर्तीसमोर यांनी हा तांत्रिक देखावा उभारला आहे. खड्ड्यावर पसरलेली खडी रोड रोलरने फिरवत रस्ता दुरुस्त करण्यात येत असल्याचा हा देखावा पाहण्यासाठी त्यांच्या घरी अनेकजण गर्दी करत आहेत.

पन्नाशीत असलेल्या मिरजकर यांना या देखाव्यासाठी त्यांचा मुलगा शुभम मदत करत होता. तो न्यू पॉलिटेक्निक येथे आॅटोमोबाईलच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. घरी वृद्ध आई आणि पत्नी आहे. बेळगाव येथे वडील नोकरीस असताना मिरजकर यांचेही शिक्षण तेथे झाले. त्यांनी काही काळ बेळगाव येथे खासगी कंपनीत नोकरीही केली. सरकारी नोकरीनंतर ते १९९९ नंतर कोल्हापुरात स्थायिक आहेत.

मिरजकर दरवर्षी गणेशोत्सवात विविध तांत्रिक देखावे घरीच तयार करत असतात. एअर बलून, वोक्सवॅगनची कार, फुलपाखरू, नारळ, महादेवाची पिंडी असे अनेक तांत्रिक देखावे त्यांनी यापूर्वी तयार केले आहेत. घरगुती गणपतीचे विसर्जन होईपर्यंत हा देखावा खुला आहे.
 

 

Web Title: Bad road reflection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.