दांडीबहाद्दर तलाठ्यांवर कारवाईचा बडगा, जिल्हाधिकाऱ्यांचे प्रांताधिकाऱ्यांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 01:56 PM2019-01-30T13:56:04+5:302019-01-30T13:57:15+5:30

मिटींगसाठी बाहेर आहे, असे सांगून वैयक्तीक कामे करणे आता येथून पुढे तलाठ्यांना चांगलेच महागात पडणार आहे. जिल्हा प्रशासनाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी केली असून प्रांताधिकाऱ्यांमार्फत दैनदिन हजेरीचा आढावा घेउन दांडी मारणाऱ्या तलाठ्यावर थेट कारवाई करा, असे आदेशच जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.

Badaga to take action on Dandi Bahadar reservoir, order to district collector's representatives | दांडीबहाद्दर तलाठ्यांवर कारवाईचा बडगा, जिल्हाधिकाऱ्यांचे प्रांताधिकाऱ्यांना आदेश

दांडीबहाद्दर तलाठ्यांवर कारवाईचा बडगा, जिल्हाधिकाऱ्यांचे प्रांताधिकाऱ्यांना आदेश

googlenewsNext
ठळक मुद्देदांडीबहाद्दर तलाठ्यांवर कारवाईचा बडगाजिल्हाधिकाऱ्यांचे प्रांताधिकाऱ्यांना आदेश: तलाठ्यांच्या दैनदिन हजेरीचा आढावा

कोल्हापूर : मिटींगसाठी बाहेर आहे, असे सांगून वैयक्तीक कामे करणे आता येथून पुढे तलाठ्यांना चांगलेच महागात पडणार आहे. जिल्हा प्रशासनाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी केली असून प्रांताधिकाऱ्यांमार्फत दैनदिन हजेरीचा आढावा घेउन दांडी मारणाऱ्या तलाठ्यावर थेट कारवाई करा, असे आदेशच जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.

गावच्या कारभारात तलाठी आणि ग्रामसेवक ही दोन महत्वाची पदे आहेत, पण अलीकडे हे दोघेही बऱ्याच वेळा गावात नसतात. आजच्या घडीला जिल्ह्यात तलाठ्यांची ४६७ पदे मंजूर आहेत, त्यापैकी ३९२ तलाठी सज्जावर कार्यरत असून ७५ जागा रिक्त आहेत. त्यामुळे बऱ्याच गावांचा अतिरिक्त भारही उपलब्ध तलाठ्यांवर सोपवण्यात आला आहे.

त्यांच्या कामाचे फिरते आणि बैठे स्वरुप असलेतरी त्यांनी कमीत कमी वेळेत जनतेच्या शासकीय प्रश्नांची सोडवणूक करावी अशी अपेक्षा असते, त्यासाठी प्रशासन त्यांना हायटेक तंत्रज्ञानही पुरवत आहे. आतापर्यंत ३८२ तलाठ्यांना लॅपटॉप दिले आहेत, आता आणखी ११९ जणांना लॅपटॉप देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यात तलाठी आणि मंडल अधिकाºयांचाही समावेश करण्यात आला आहे.

एवढ्या सुविधा पुरवूनही प्रत्यक्षात तलाठी गावात बऱ्याच वेळा आढळून येत नाहीत. एकेका गावात तर चार चार दिवस फिरकतच नाहीत, फोन केला तर बैठकीत असल्याचे सांगतात, सातत्याने गैरहजर असतात, अशा सर्वसामान्य नागरीकांच्या तक्रारी आहेत.

ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करुनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने कांही गावातील ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाने रितसर तक्रारी दिल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत रोजच्या रोज हजरेचा आढावा घेउन दांडीबहाद्रावर कारवाई करा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना काढले आहेत. त्यामुळे आता तलाठ्यांची रोजच्या रोज हजेरी होणार आहे,त्यात कसूर आढळल्यास थेट कारवाईची प्रक्रिया होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील चार कर्मचारी बडतर्फ

जिल्हाधिकारी कार्यालयात सेवेत असूनही कामावर न परतलेल्या चार कर्मचाऱ्यांना अखेर जिल्हा प्रशासनाने बडतर्फ केले आहे. गेल्या कांही वर्षापासून हे कर्मचारी कार्यालयात फिरकलेलेच नाहीत, ते गायब आहेत, असे समजून त्यांच्या सेवासमाप्तीचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामध्ये लिपीक उदय खांडकेर, लिपिक अनिल पाटील, शिपाई रघुनाथ कांईगडे व रामचंद्र जाधव यांचा समावेश आहे. आणखी कांही जणांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्यावरही लवकरच कारवाई होईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
 

 

Web Title: Badaga to take action on Dandi Bahadar reservoir, order to district collector's representatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.