Kolhapur- विशाळगड तोडफोड: फोटोत दिसणाऱ्या ७ जणांचा जामीन फेटाळला, १७ संशयितांचा जामीन मंजूर
By उद्धव गोडसे | Published: August 6, 2024 04:10 PM2024-08-06T16:10:23+5:302024-08-06T16:12:19+5:30
सात संशयित उच्च न्यायालयात दाद मागणार
कोल्हापूर : विशाळगडाच्या पायथ्याला झालेल्या तोडफोडीत फोटोंमध्ये दिसणाऱ्या सात जणांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश (४) ए. पी. गोंधळेकर यांनी आज, मंगळवारी (दि. ६) फेटाळला. उर्वरित १७ संशयितांचा जामीन मंजूर झाला. १५ जुलैपासून सर्व संशयित अटकेत आहेत. जामीन मंजूर न झालेले सात जण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली.
चेतन आनंदराव जाधव (वय ३०), ओंकार दादा साबळे (२१), सूरज माणिक पाटील (२९), आदित्य अविनाश उलपे (२९), ओंकार तुकाराम चौगुले (२१, सर्व रा. कसबा बावडा, कोल्हापूर), ओंकार सुनीलसिंह राजपूत (२९, रा. जाधववाडी, कोल्हापूर) आणि सिद्धार्थ धोंडिबा कटकधोंड (३०, रा. जवाहरनगर, कोल्हापूर) अशी जामीन नामंजूर झालेल्या संशयितांची नावे आहेत.
सुशांत आत्माराम सरदेसाई (२८, रा. कणेरीवाडी, ता. करवीर), गोपी कुंडलिक सूर्यवंशी (३०), महेश आनंदा पाटील(२२), सचिन विठ्ठल संकपाळ (४२, तिघे रा. गोकुळ शिरगाव), प्रेम पंडित पाटील (२१) रोहन पांडुरंग पाटील (२५), दीपक तानाजी सोळवंडे (२६), सुशांत दिनकर उलपे (२६, चौघे रा. कसबा बावडा), नितीन बाबूराव वर्पे (५१), प्रकाश गणपतराव मोरबाळे (४७), मधुकर बब्रूवान गुरव (४५), मधुसुदन प्रताप भोई (३५), योगेश चांगदेव पाटील (४३, सर्व रा. इचलकरंजी), संतोष आप्पासाहेब साठे (३०), मयूर विजय दीक्षित (२८, दोघे रा. धनकवडी, पुणे) आणि ईश्वर राजकुमार कट्टे (२४, रा. कात्रज, पुणे) यांना जामीन मंजूर झाला.
संशयितांच्या वतीने ॲड. सागर शिंदे, ॲड. अभिजीत देसाई. ॲड. धनंजय चव्हाण, ॲड. केदार मुनीश्वर यांनी काम पाहिले. सरकार पक्षामार्फत ॲड. समीर तांबेकर आणि ॲड. पी. जी. जाधव यांनी काम पाहिले.