खूनप्रकरणातील संशयितांचा जामीन रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:51 AM2021-02-05T06:51:18+5:302021-02-05T06:51:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील ईदगाह मैदान परिसरात पूर्ववैमनस्यातून झालेल्या दीपक कोळेकर (रा. कोरोची, ता.हातकणंगले) याच्या खूनप्रकरणातील मुख्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील ईदगाह मैदान परिसरात पूर्ववैमनस्यातून झालेल्या दीपक कोळेकर (रा. कोरोची, ता.हातकणंगले) याच्या खूनप्रकरणातील मुख्य संशयित आरोपीचा जामीन न्यायालयाने रद्द केला. आकाश संजय वासुदेव (वय २७, रा. भोनेमाळ) असे त्याचे नाव आहे. स्टेटसला चिथावणीखोर मजकूर ठेवल्यामुळे ही कारवाई झाली. जामीन रद्द झाल्याची माहिती समजताच दीपकने शहरातून पलायन केले. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
दीपक कोळेकर याचा १० डिसेंबर २०१९ ला ईदगाह मैदानाजवळ खून करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य संशयित आकाश वासुदेव याच्यासह सातजण सध्या जामिनावर बाहेर आहेत. सशर्त जामिनावर बाहेर असताना आकाश याने सोशल मीडियावर ‘मर्डरला एक वर्ष पूर्ण. दुसऱ्या वादाची तयारी सुरू’ अशा आशयाचा मजकूर स्टेटसला ठेवला होता. त्यामुळे त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणामुळे झालेल्या सुनावणीत दहशत माजवणे, तरुण मुलांना जमवणे, गुन्हेगारी स्टेटस ठेवणे, बेकायदेशीर कृत्य करणे, आदी कारणांसाठी त्याचा जामीन न्यायालयाने रद्द केला, अशी माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी दिली.