सामाजिक उपक्रमांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 06:00 PM2020-01-23T18:00:52+5:302020-01-23T18:02:27+5:30
अंध मुलांना फळे वाटप, हृदयविकारग्रस्त शस्त्रक्रिया नोंदणी शिबिर असे विविध सामाजिक उपक्रम राबवून रविवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये शिवसैनिकांनी ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कोल्हापूर : अंध मुलांना फळे वाटप, हृदयविकारग्रस्त शस्त्रक्रिया नोंदणी शिबिर असे विविध सामाजिक उपक्रम राबवून रविवारी शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये शिवसैनिकांनी ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त आण्णासाहेब पाटील महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शाहू स्मारक भवन येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी करण्यात आली.
मान्यवरांनी ठाकरे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे, राजू यादव, अभिजित साळोखे, चंद्रकांत भोसले, दिलीप देसाई, महिला जिल्हा संघटक शुभांगी पोवार, गीतांजली गायकवाड, सुनीता हनिमनाळे, वंदना पाटील, स्मिता सावंत, सिद्धी मिठारी, आदी उपस्थित होते.
याचबरोबर राजोपाध्येनगर येथील अंध मुला-मुलींना फळे व अल्पोपाहार वाटप करण्यात आले. यावेळी रणजित आयरेकर, महेश उरसाल, हर्षल पाटील, अंध युवक मंचचे अध्यक्ष संजय ढेंगे, संतोष पाटील, दीपा शिंदे उपस्थित होते.
मोफत हृदय शस्त्रक्रिया नोंदणी शिबिर
राजेश क्षीरसागर फौंडेशन आणि शिवसेना शहर कार्यकारिणीच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयविकाराने ग्रस्त जन्मजात शिशूंसाठी मोफत हृदय शस्त्रक्रिया नोंदणी शिबिर घेण्यात आले.
शहरप्रमुख रविकिरण इंगवले म्हणाले, लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रियांना लाखो रुपयांचा खर्च येतो. अनेक वेळा कमी उत्पन्नातून इतकी मोठी रक्कम कुठून आणायची, असा प्रश्न पालकांना पडतो. पैशापेक्षा मुलाचे प्राण महत्त्वाचे म्हणून उसनवारी करून, दागदागिने व मालमत्ता गहाण ठेवून पैसे उभे केले जातात. अशा गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळावा आणि त्यांच्या मुलांना नवजीवन जगता यावे, यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हृदयविकाराने ग्रस्त जन्मजात शिशूंच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया नोंदणी शिबिर घेण्यात आले.
यावेळी युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, दीपक गौड, महिला आघाडी शहरप्रमुख मंगल साळोखे, माजी शहरप्रमुख पूजा भोर, पूजा कामते, रूपाली कवाळे, मीनाताई पोतदार, आदी उपस्थित होते