सैन्यभरतीच्या आमिषाने गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 12:12 AM2020-01-20T00:12:06+5:302020-01-20T00:12:34+5:30

कोल्हापूर : सैन्यदलात शिपाई भरतीचे आमिष दाखवून भरतीप्रक्रियेदरम्यान बनावट प्रश्नपत्रिका देऊन तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी शाहूवाडी येथील अफझल ...

Bald with the entourage of the army | सैन्यभरतीच्या आमिषाने गंडा

सैन्यभरतीच्या आमिषाने गंडा

Next

कोल्हापूर : सैन्यदलात शिपाई भरतीचे आमिष दाखवून भरतीप्रक्रियेदरम्यान बनावट प्रश्नपत्रिका देऊन तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी शाहूवाडी येथील अफझल देवळेकरसह चौघांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात रविवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
संशयित मुख्य सूत्रधार अफझल कासम देवळेकर ऊर्फ सरकार (रा. कडवे, ता. शाहूवाडी), अरविंद लोंढे, अकिब हवालदार (रा. मलकापूर, ता. शाहूवाडी), दिलावर हवालदार (रा. टेकोली, ता. शाहूवाडी) अशी संशयितांची नावे आहेत. या रॅकेटकडून कोल्हापूर, कराड, सांगली, सातारा, पुणे, मुंबई येथील बेरोजगार तरुणांची फसवणूक करण्यात आली आहे. संशयितांना अटक झाल्यानंतर प्रकरणामागचे गुढ उकलणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक नवनाथ घोगरे यांनी दिली.
पोलिसांनी सांगितले, फिर्यादी सौरभ सुभाष कुरणे (वय १९, रा. शिवनेरी चौक, घुणकी, ता. हातकणंगले) याला नोकरीची गरज होती. त्याची संशयित अफझल देवळेकर याच्याशी ओळख झाली. त्याने ‘भारतीय सैन्य दलामध्ये शिपाई पदाची भरती सुरू आहे. तुला भरती करून घेतो; त्यासाठी तीन ते पाच लाख रुपये द्यावे लागतील’, असे सांगून विश्वास संपादन केला. तसेच कोळे (ता. कराड) येथील स्वराज्य अकॅडमीत प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून पैशाची मागणी केली. या तरुणांकडून मूळ शैक्षणिक कागदपत्रेठेवून घेतली. काम झाले की पैसे द्यावे लागतील, त्यानंतरच कागदपत्रेदेऊ , असे सांगितले.
‘आर्मी’ प्रशासनाची फसवणूक
संशयित देवानंद केरबा पाटील (रा. मुदाळ, ता. भुदरगड) याने सैन्यात नोकरी मिळविण्यासाठी २७ डिसेंबर २०१९ रोजी ‘एन. सी. सी.’चे बनावट प्रमाणपत्र भरतीमध्ये सादर केले. हा प्रकार कर्नल अनुराग सक्सेना यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पाटील याला संशयित देवळेकर रॅकेटनेच बोगस प्रमाणपत्र दिल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.
असा झाला उलगडा
शनिवारी मध्यरात्री कोल्हापुरातील टेंबलाईवाडी येथील मिलीटरी कॅम्प परिसरात भरतीसाठी आलेल्या तरुणांना संशयित अफझल देवळेकर, अकिब हवालदार, दिलावर हवालदार यांनी भारतीय सैन्य दलाचे शिपाई पदासाठीच्या बनावट प्रश्नपत्रिका तरुणांच्या व्हॉटस् अ‍ॅपवर पाठविल्या. त्याची खात्री केल्यानंतर त्या बोगस असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार फसवणूक झालेल्या तरुणांनी थेट राजारामपुरी पोलीस ठाणे गाठले. या ठिकाणी संशयितांविरोधात फिर्याद दिली.
सैन्यदलात नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक करणाºया संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी प्रश्नपत्रिका कोठे तयार केल्या. त्या आणखी किती तरुणांना देऊन फसवणूक केली आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, हे तपासात निष्पन्न होईल.
नवनाथ घोगरे : पोलीस निरीक्षक, राजारामपुरी पोलीस ठाणे.

Web Title: Bald with the entourage of the army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.