बालगोपाल, पीटीएम ‘अ’, ‘खंडोबा’ची आगेकूच ; राजेश फुटबॉल चषक स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 12:39 AM2018-03-03T00:39:33+5:302018-03-03T00:39:33+5:30

कोल्हापूर : राजेश फुटबॉल चषक स्पर्धेत बालगोपाल तालीम मंडळने संयुक्त जुना बुधवार पेठचा, तर पीटीएम ‘अ’ ने नवज्योत व ‘खंडोबा’ ने ‘कोल्हापूर पोलीस’संघाचा पराभव करत पुढील फेरी गाठली

 Balgopal, PTM 'A', 'Khandoba' ahead; Rajesh Football Trophy Tournament | बालगोपाल, पीटीएम ‘अ’, ‘खंडोबा’ची आगेकूच ; राजेश फुटबॉल चषक स्पर्धा

बालगोपाल, पीटीएम ‘अ’, ‘खंडोबा’ची आगेकूच ; राजेश फुटबॉल चषक स्पर्धा

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूर पोलीस, सयुंक्त जुना बुधवार पेठ पराभूत

कोल्हापूर : राजेश फुटबॉल चषक स्पर्धेत बालगोपाल तालीम मंडळने संयुक्त जुना बुधवार पेठचा, तर पीटीएम ‘अ’ ने नवज्योत व ‘खंडोबा’ ने ‘कोल्हापूर पोलीस’संघाचा पराभव करत पुढील फेरी गाठली.
शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत सकाळी आठ वाजता पहिल्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळने कोल्हापूर पोलीस संघाचा ५-१ असा पराभव केला. या सामन्यात ‘खंडोबा’कडून १५ व्या मिनिटाला ऋतुराज संकपाळने, तर २८ व ४३ व्या मिनिटाला सुधीर कोटिकेलाने व ६५ व्या मिनिटाला रणवीर चव्हाणने व ७२ व्या मिनिटाला अर्जुन शेटगांवकरने गोल केले तर पोलीसकडून एकमेव गोल सौरभ पोवारने केला.
दुसºया सामन्यात पीटीएम (अ) ने गडहिंग्लजच्या नवज्योत तरुण मंडळचा ४-० असा एकतर्फी पराभव केला. त्यात पीटीएम(अ)कडून चौथ्या मिनिटाला हृषिकेश मेथे-पाटीलने, तर ११ व्या व पूर्वार्धाच्या जादा वेळेत ओंकार जाधवने गोल करत ३-० अशी आघाडी मिळविली. उत्तरार्धात नवज्योत संघाकडून आघाडी कमी करण्याचे प्रयत्न झाले. मात्र, बलाढ्य पीटीएम (अ) संघापुढे त्यांचा टिकाव लागला नाही. ७५ व्या मिनिटास पीटीएम(अ) कडून डेव्हिड इटोने गोल करत ही आघाडी ४-० अशी भक्कम केली. याच गोलसंख्येवर पीटीएम(अ) ने एकतर्फी विजय मिळविला.
अखेरच्या सामन्यात बालगोपाल तालीम मंडळाने संयुक्त जुना बुधवार पेठ संघाचा ४-० असा पराभव केला. यात ‘बालगोपाल’कडून ३२ व्या मिनिटाला श्रीधर परबने, तर ६६ व्या व ७८ व्या मिनिटास ऋतुराज पाटीलने व ८० व्या मिनिटास रोहित कुरणेने गोल करत ४-० अशी भक्कम आघाडी संघास मिळवून दिली. जुना बुधवारकडून आघाडी कमी करण्याचे प्रयत्न झाले. मात्र, त्यांना गोल करण्यात यश आले नाही. त्यामुळे हा सामना बालगोपालने ४-० असा एकतर्फी जिंकला.

पंचांबद्दलची तक्रार मागे
प्रॅक्टिस क्लबने के.एस.ए.लीग स्पर्धेच्यावेळी पंचांच्या निर्णयाविरोधात भूमिका घेत पंच राहुल तिवले, पंच प्रदीप साळोखे यांच्या निर्णयासंदर्भात के.एस.ए.कडे तक्रार नोंदविली होती. याबाबत क्लबने के.एस.ए.कडे माफीनामा देत पंचाबद्दल तक्रार मागे घेत झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

Web Title:  Balgopal, PTM 'A', 'Khandoba' ahead; Rajesh Football Trophy Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.