बालिंगेत कडकडीत बंद

By admin | Published: June 20, 2015 12:42 AM2015-06-20T00:42:49+5:302015-06-20T00:46:21+5:30

प्रस्तावित हद्दवाढीस विरोध : शासनास हद्दवाढ रोखण्यास भाग पाडू : मधुकर जांभळे

Baling sticks in the stem | बालिंगेत कडकडीत बंद

बालिंगेत कडकडीत बंद

Next

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीविरोधात शुक्रवारी बालिंगे (ता. करवीर) ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून विरोध दर्शविला. यावेळी ग्रामस्थांनी निषेधफेरीही काढली. महापालिकेच्या हुकूमशाहीवर सडकून टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मधुकर जांभळे म्हणाले, गेले अनेक वर्षे जे पूर्वीच्या शहराचा विकास करू शकले नाहीत, ते आमच्या गावांचा काय करणार? शहरालगतच्या गावात अजूनही पारंपरिक व्यवसाय सुरू आहेत, शेतकऱ्यांच्या संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दुग्ध व्यवसाय असल्याने जनावरांची संख्याही अधिक आहे. शहरापेक्षा चांगल्या सुविधा ग्रामपंचायत नागरिकांना देत असताना महापालिकेची दंडूकशाही का? अशी विचारणा केली. शहरातील नागरिकांना सुविधा देताना महापालिकेची दमछाक उडत असताना आणखी लोकसंख्या वाढवून नेमके काय साधणार आहात. वीस गावांना एकत्रित करीत हद्दवाढीविरोधात एल्गार उभार करून शासनास हद्दवाढ रोखण्यास भाग पाडू, असेही जांभळे यांनी सांगितले. रघुनाथ बुडके, श्रीकांत भवड यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच गीता कांबळे, उपसरपंच दशरथ वाडकर, ग्रामपंचायत सदस्य अमर जत्राटे, विश्वास सुतार, अतुल बोंद्रे, संजय भवड, विश्वास भवड, शशांक जांभळे, अनिता माळी, वसंतराव जांभळे, ममता घोडके, रुपाली जांभळे, अनिल पोवार, एम. एस. भवड, धनाजी ढेंगे, राजेंद्र चौगुले, विनायक कांबळे, मारुती जांभळे, प्रकाश माळी, बाजीराव माने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Baling sticks in the stem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.