बालिंगा जलशुध्दीकरण केंद्र आज सुरु होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:23 AM2021-07-26T04:23:03+5:302021-07-26T04:23:03+5:30

कोल्हापूर : शहराच्या निम्म्या भागाला पाणी पुरवठा करणारे बालिंगा जलशुध्दीकरण केंद्र आज (सोमवारी) रात्रीपर्यंत सुरु होण्याची शक्यता प्रशासक कादंबरी ...

Balinga Water Treatment Plant is expected to start today | बालिंगा जलशुध्दीकरण केंद्र आज सुरु होण्याची शक्यता

बालिंगा जलशुध्दीकरण केंद्र आज सुरु होण्याची शक्यता

Next

कोल्हापूर : शहराच्या निम्म्या भागाला पाणी पुरवठा करणारे बालिंगा जलशुध्दीकरण केंद्र आज (सोमवारी) रात्रीपर्यंत सुरु होण्याची शक्यता प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

महापुराच्या पाण्यात अडकलेल्या बालिंगा उपसा केंद्रातील मोटारी पुराच्या पाण्यातून बाहेर आणून त्या काही उंचीवर बसविण्यात येत आहेत. मोटारींचे हिटींग करण्याचे काम सुरु आहे. ट्रान्सफॉर्मर जोडला जात आहे. त्यामुळे आज (सोमवारी) रात्रीपर्यंत उपसा केंद्र सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जर केंद्र सुरु झाले तर मंगळवारपासून निम्म्या शहराला ४० दशलक्ष घनमीटर इतक्या क्षमतेने पाणी पुरवठा केला जाऊ शकतो. त्यामुळ टँकरवरील भार थोडा कमी होईल, असे बलकवडे यांनी सांगितले.

शिंगणापूर येथील उपसा केंद्र सुरु करण्यास मात्र काही दिवस लागणार आहेत. महापूर ओसरल्यानंतरच यंत्रे बाहेर काढून त्यांची दुरुस्ती करावी लागणार आहे, असे त्यांनी सांगितले. पाण्याचे संकट मोठे आहे, याची जाणीव आम्हाला आहे. परंतु, नागरिकांना टँकरद्वारे पाणी देण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. नागरिकांनी थोडा संयम राखून सहकार्य करावे, असे आवाहन बलकवडे यांनी केले.

Web Title: Balinga Water Treatment Plant is expected to start today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.