कोल्हापुरात गुरुवारी बळिराजा महोत्सव
By admin | Published: November 10, 2015 11:35 PM2015-11-10T23:35:14+5:302015-11-10T23:53:14+5:30
मंजुश्री पवार, इंद्रजित घाटगे यांना पुरस्कार
कोल्हापूर : बळिराजा महोत्सव समिती, कोल्हापूूर यांच्यावतीने यावर्षी ‘बळिराजा महोत्सवाचे गुरुवारी (दि. १२) आयोजन केले आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजन समितीचे सदस्य व्यंकाप्पा भोसले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. गुरुवारी सकाळी अकरा वाजता बळिराजा प्रतिमेचे पूजन बिंदू चौक येथे करण्यात येणार आहे. सायंकाळी सहा वाजता हसूर (ता. करवीर) येथे प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांचे ‘बळिराजा संस्कृती’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
यंदाचा ‘बळिराजा पुरस्कार’ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते बजरंग लोणारी (इचलकरंजी), इतिहास संशोधक प्रा. डॉ. मंजुश्री पवार, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते इंद्रजित घाटगे (कागल) यांना देऊन गौरविण्यात येणार आहे. मंगळवारी (दि. १७)सायंकाळी पाच वाजता शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती व्यंकाप्पा भोसले यांनी दिली. यावेळी बाबूराव कदम, प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील, एस. पी. कांबळे, दिगंबर लोहार, रवी जाधव, बबन रानगे, अॅड. सचिन जाधव, धनाजीराव जाधव, आदी उपस्थित होते. ( प्रतिनिधी )