बळीराजाचा झेंडा छाताडावर ठेवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही :राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 03:49 PM2020-12-08T15:49:06+5:302020-12-08T17:30:11+5:30
BharatBand, Farmer strike, Raju Shetty, kolhapur देशभरातील लोकांनी बंदमध्ये सहभागी होवून शेतकरी बांधवांच्या सोबत असल्याचे दाखवून दिले. यामुळे तीन कायदे रद्द करण्यासाठी बारा हत्तीचे बळ मिळाले आहे. बळीराजाचा झेंडा केद्र सरकारच्या छाताडावर ठेवल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
कोल्हापूर : देशभरातील लोकांनी बंदमध्ये सहभागी होवून शेतकरी बांधवांच्या सोबत असल्याचे दाखवून दिले. यामुळे तीन कायदे रद्द करण्यासाठी बारा हत्तीचे बळ मिळाले आहे. बळीराजाचा झेंडा केद्र सरकारच्या छाताडावर ठेवल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने मंगळवारी भारत बंदचे आवाहन केले होते. तसेच दिल्लीतील १३ दिवस सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा म्हणून बिंदू चौक येथे पिठलं भाकरी व सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
बिंदू चौकामध्ये सर्वच पक्षातील, संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व समाज एका बाजूल असताना मुठभर व्यक्ती कायदाची अंमलबजावणी करणारच असे ठामपणे सांगत आहेत. त्यांना पुन्हा पेशवाई आणायची आहे काय. अशी स्वप्न पाहू नका, असे शेट्टी यांनी ठणकावून सांगितले.
चंद्रकांत पाटील यांना बिंदू चौकात येण्याचे खुले आव्हान
चंद्रकांत पाटील कायदाची अंमलबजावणी होणारच असे म्हणातात. तुम्ही कायदा वाचला आहे का. एकदा कायदा वाचा आणि काय अंमलबजावणी करणार हे आम्हालाही सांगा किंवा बिंदू चौकात सभा घेवून समोरासमोर चर्चेला या, असे आव्हान शेट्टी यांनी केले.