बाळू मामांची एक्झिट मनाला चटका लावणारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 06:31 PM2021-05-29T18:31:03+5:302021-05-29T18:33:36+5:30
Death Kolhapur : शिवाजी विद्यापीठाचे कर्मचारी व राजाराम तलावाचे मोटर पंप ऑपरेटर बाळू सखाराम शेळके (वय ५८, रा.कणेरीवाडी) यांचे शुक्रवारी (दि.२८) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, विवाहीत मुलगी, असा परिवार आहे. ते सोमवारी (दि. ३१) नियत वयोमानानूसार निवृत्त होणार होते. मात्र, तत्पुर्वी त्यांच्यावर तीन दिवस अगोदरच काळाने घाला घातला.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कर्मचारी व राजाराम तलावाचे मोटर पंप ऑपरेटर बाळू सखाराम शेळके (वय ५८, रा.कणेरीवाडी) यांचे शुक्रवारी (दि.२८) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, विवाहीत मुलगी, असा परिवार आहे. ते सोमवारी (दि. ३१) नियत वयोमानानूसार निवृत्त होणार होते. मात्र, तत्पुर्वी त्यांच्यावर तीन दिवस अगोदरच काळाने घाला घातला.
शिवाजी विद्यापीठात राजाराम तलाव येथे ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. तलावापासून सोडलेले पाणी बागेतील हौदात योग्य पडते कि नाही हे पाहण्यासाठी ते रात्री अपरात्री येत असत. ते बाळू मामा या नावाने प्रसिद्ध होते. प्रामाणिक तत्पर सेवक म्हणून विद्यापीठात गणले जायचे.
विद्यापीठात १९ जून १९९५ साली शिपाई म्हणून भरते झाले. सध्या ते हवालदार म्हणून कार्यरत होते. २५ वर्षे ११ महिने आणि बारा दिवसांच्या सेवेनंतर ते सोमवारी नियत वयोमानानूसार निवृत्त होणार होते. तत्पुर्वी त्यांचे निधन झाले. त्यांच्या अशा अचानक जाण्याने विद्यापीठ वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.