आदमापूर येथे ५ ते १३ एप्रिल अखेर होणारा बाळूमामा भंडारा उत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:24 AM2021-04-02T04:24:31+5:302021-04-02T04:24:31+5:30

वाघापूर : महाराष्ट्र,गोवा, आंध्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या क्षेत्र आदमापूर(ता.भुदरगड)येथील सद्गुरू बाळूमामांचा ५ ते १३ एप्रिल अखेर ...

Balumama Bhandara festival to be held from 5th to 13th April at Adamapur canceled | आदमापूर येथे ५ ते १३ एप्रिल अखेर होणारा बाळूमामा भंडारा उत्सव रद्द

आदमापूर येथे ५ ते १३ एप्रिल अखेर होणारा बाळूमामा भंडारा उत्सव रद्द

googlenewsNext

वाघापूर : महाराष्ट्र,गोवा, आंध्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या क्षेत्र आदमापूर(ता.भुदरगड)येथील सद्गुरू बाळूमामांचा ५ ते १३ एप्रिल अखेर होणारा वार्षिक भंडारा उत्सव यात्रा वाढत असलेल्या कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती भुदरगडचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली. कोरोना या जागतिक रोगाच्या फैलावामुळे सदरचा निर्णय घेण्यात आला आहे. ही बैठक आदमापूर येथील

बाळूमामा देवालयात घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी बाळूमामा देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले होते. या बैठकीत देवस्थानचे व्यवस्थापक अशोक पाटील यांनी कोरोना रोगाच्या संदर्भात बैठकीचा हेतू सांगितला.

यावेळी यात्रा कालावधीत होणारे भजन, प्रवचन, कीर्तन, हरिजागर, रोजची आरती, जागर, पालखी सोहळा, महाप्रसाद, आंबील प्रसाद या सेवा बंद करण्याचा निर्णय घेणेत आला. अनेक कार्यक्रमही रद्द करणेत आले आहेत. तसेच अमावस्या व गुढीपाडवा यात्राही रद्द केली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचा पुढील आदेश येईपर्यंत येथील सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. या निर्णयाची भाविकांनी नोंद घेऊन बाळूमामा देवालय समिती व ग्रामस्थांना सहकार्य करावे, असे आवाहन कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम यांनी केले. धैर्यशील भोसले, प्रा.एस.पी. पाटील, सुधीर पाटील

, नामदेव पाटील, प्रा.शिवाजी खतकर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी सरपंच विजयराव गुरव, पोलीस पाटील माधुरी पाटील, गुंडोपंत पाटील, विकास पाटील आदी उपस्थित होते.

स्वागत शंकरराव कुदळे यांनी केले तर आभार सरपंच विजयराव गुरव यांनी मानले.

फोटो ओळी: आदमापूर (ता.भुदरगड)येथे बाळूमामा देवालयात झालेल्या बैठकीत बोलताना भुदरगडचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, शेजारी कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम, अध्यक्ष धैर्यशील भोसले, सरपंच विजयराव गुरव आदी

Web Title: Balumama Bhandara festival to be held from 5th to 13th April at Adamapur canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.