Coronavirus Unlock- आदमापूरातील बाळुमामांचे मंदीर १३ व १४ तारखेला अमावस्येला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 02:57 PM2020-12-07T14:57:20+5:302020-12-07T15:01:14+5:30

Coronavirus Unlock, Religious Places, Balumamachya Navane Changbhale, kolhapur कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या अमावस्येला होणारी गर्दी टाळण्यासाठी रविवार १३ व सोमवार १४ डिसेंबर रोजी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले व कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम यांनी दिली.

The Balumama temple in Adampura is closed on 13th and 14th of the new moon | Coronavirus Unlock- आदमापूरातील बाळुमामांचे मंदीर १३ व १४ तारखेला अमावस्येला बंद

Coronavirus Unlock- आदमापूरातील बाळुमामांचे मंदीर १३ व १४ तारखेला अमावस्येला बंद

googlenewsNext
ठळक मुद्देआदमापूरातील बाळुमामांचे मंदीर १३ व १४ तारखेला अमावस्येला बंददेवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष मगदूम यांची माहिती

सरवडे- राज्यातील सर्व मंदिरे खुली करण्यात आल्यानंतर क्षेत्र आदमापूर येथील संत बाळुमामांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या अमावस्येला होणारी गर्दी टाळण्यासाठी रविवार १३ व सोमवार १४ डिसेंबर रोजी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले व कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम यांनी दिली.

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे राज्यातील सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. त्यानुसार क्षेत्र आदमापूर येथील मंदिर देखील सकाळी आठ ते सायंकाळी पाच पर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते.

संत बाळुमामांच्या दर्शनासाठी राज्या -परराज्यातून अमावस्येला मोठ्या प्रमाणात येतात. कोरोनाची खबरदारी म्हणून अमवस्याला होणारी गर्दी टाळण्यासाठी रविवार १३ व सोमवार १४ डिसेंबर रोजी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.

मंगळवार १५ डिसेंबर पासून पुन्हा सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी सुरू करण्यात येणार आहे. भाविकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.

Web Title: The Balumama temple in Adampura is closed on 13th and 14th of the new moon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.