कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:55 PM2019-08-12T12:55:26+5:302019-08-12T13:06:54+5:30
गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या मोठ्या अतीवृष्टीमुळे उद्भवलेल्या महापुराची परिस्थिती व त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन यातून पूरगस्त व नागरिक यांच्याकडून गोंधळ निर्माण होण्याची शक्यता त्यामुळे बंदी आदेश जारी करण्यात आल्याची माहिती अपर जिल्हादंडाधिकारी संजय शिंदे यांनी दिली आहे.
कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या मोठ्या अतीवृष्टीमुळे उद्भवलेल्या महापुराची परिस्थिती व त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन यातून पूरगस्त व नागरिक यांच्याकडून गोंधळ निर्माण होण्याची शक्यता त्यामुळे बंदी आदेश जारी करण्यात आल्याची माहिती अपर जिल्हादंडाधिकारी संजय शिंदे यांनी दिली आहे.
दि. 12 ऑगस्ट रोजी मुस्लिम बांधवांचा साजरा होणारा बकरी ईद सण, दि. 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतात साजरा होणारा स्वतंत्र दिवस व दि. 24 ऑगस्ट रोजी साजरा होणारा दहीहंडी सण आदी सणांचे औचित्य साधून आत्महत्या, उपोषण, ठिय्या आंदोलन, पक्ष/संघटनांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी वारंवार होणारी आंदोलने इत्यादी प्रकारची आंदोलने, जिल्ह्यात यादरम्यान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यात काही अनपेक्षित घटना घडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस अधिनियम, 1951 चे कलम 37(1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये कोल्हापूर जिल्ह्यात दि. 12 ऑगस्ट ते दि. 24 ऑगस्ट 2019 रात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश जारी करण्यात येत आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी संजय शिंदे यांनी दिली आहे.