शाळा, महाविद्यालयाच्या २00 मीटर परिसरात पानपट्टीस बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 01:36 PM2019-07-15T13:36:37+5:302019-07-15T13:38:03+5:30

कोल्हापूर शहरातील शाळा, महाविद्यालयाच्या २00 मीटर परिसरात पानपट्टी अथवा पानटपरीस बंदी घालण्यात येईल. तरुणांना निर्व्यसनी बनविण्यासाठी महाविद्यालयांचे परिसर व्यसनमुक्त होण्याची गरज आहे. स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांनी त्यांचे कुटुंबीय आणि नागरिकांना पटवून देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी  केले.

Ban on Panpatties in 200 meters of school, college | शाळा, महाविद्यालयाच्या २00 मीटर परिसरात पानपट्टीस बंदी

 कोल्हापुरात शहाजी कॉलेजमध्ये महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी प्राध्यापक, विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी शेजारी आर. के. शानेदिवाण, दिलीप देसाई, आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देशाळा, महाविद्यालयाच्या २00 मीटर परिसरात पानपट्टीस बंदीमल्लिनाथ कलशेट्टी; शहाजी कॉलेजमधील तंबाखूविरोधी मोहीम

कोल्हापूर : शहरातील शाळा, महाविद्यालयाच्या २00 मीटर परिसरात पानपट्टी अथवा पानटपरीस बंदी घालण्यात येईल. तरुणांना निर्व्यसनी बनविण्यासाठी महाविद्यालयांचे परिसर व्यसनमुक्त होण्याची गरज आहे. स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांनी त्यांचे कुटुंबीय आणि नागरिकांना पटवून देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी  केले.

दसरा चौक येथील शहाजी छत्रपती महाविद्यालयात आयोजित स्वच्छता मोहीम, वृक्षारोपन, तंबाखूविरोधी अभियान अशा संयुक्त कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, केएमसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. गवळी , प्रजासत्ताकचे दिलीप देसाई प्रमुख उपस्थित होते.

डॉ. शानेदिवाण म्हणाले, ‘विद्यार्थ्याला स्वत:च्या स्वच्छतेबरोबरच घराच्या स्वच्छतेची सवय लागली पाहिजे. शहाजी महाविद्यालयाचा परिसर २५ वर्षांपासून व्यसनमुक्त आहे. या कार्यक्रमास पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड, एन. एस. एस. समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीषा भोसले, पर्यवेक्षक प्रा. बी. बी. पाटील, सागर चरापले, आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

 

 

Web Title: Ban on Panpatties in 200 meters of school, college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.