प्लास्टिक, डॉल्बीच्या वापरावर बंदी घाला
By admin | Published: June 26, 2015 12:20 AM2015-06-26T00:20:13+5:302015-06-26T00:20:13+5:30
गडहिंग्लजमधील विविध संघटनांची मागणी
गडहिंग्लज : न्यायालयाचा बंदी आदेश असतानाही शहरासह तालुक्यात डॉल्बी आणि प्लास्टिकचा सर्रास वापर सुरू आहे. त्यामुळे ध्वनिप्रदूषणासह प्लास्टिकच्या दुष्परिणामांना जनतेला सामोरे जावे लागत असून त्यांच्या वापरावर निर्बंध आणण्याची मागणी येथील विविध संघटनांकडून निवेदनाद्वारे करण्यात आली.प्लास्टिकच्या वापरामुळे निसर्गाची हानी होत असून जनावरांना इजा पोहोचत आहे. नगरपालिकेच्या बंदी आदेशाला झुगारून सर्वत्र प्लास्टिकचा वापर वाढला असून प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे नगराध्यक्षांकडे करण्यात आली, तर वरातीसह अन्य मिरवणुकीत डॉल्बीचा सर्रास वापर वाढल्याने ध्वनिप्रदूषण होऊन नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागतो. त्यामुळे डॉल्बीचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षकांना देण्यात आले.निवेदनावर गार्डन्स ग्रुप, सह्याद्री अॅडव्हेंचर्स, लायन्स क्लब, रोटरी क्लब, ज्येष्ठ नागरिक संघटना, युनिव्हर्सल फे्रंडर्स सर्कल, गांधीनगर युथ सर्कल, प्रोग्रेसिव्ह, हिरण्यकेशी पर्यावरण मंडळ, मराठी विज्ञान परिषद, अंनिस, पानसरे विचार मंच आदींसह अन्य संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)