स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला बँको ब्लू रिबन पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 11:49 AM2021-02-02T11:49:52+5:302021-02-02T11:55:33+5:30
Banking Kolhapur- बँको ब्लू रिबन पुरस्कार स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला २०० ते ३०० कोटी ठेव वर्गवारीतील संस्था गटात घोषित झाला आहे. बँको पुरस्कार आयोजकांनी पुरस्कारासाठी स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची निवड केल्याचे सांगितले.
रत्नागिरी : बँको ब्लू रिबन पुरस्कार स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला २०० ते ३०० कोटी ठेव वर्गवारीतील संस्था गटात घोषित झाला आहे. बँको पुरस्कार आयोजकांनी पुरस्कारासाठी स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची निवड केल्याचे सांगितले.
गेली चार वर्षे विविध ठेव गटांमध्ये संस्थेला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. यावर्षी २०० ते ३०० कोटी ठेव असणाऱ्या संस्था गटात हा पुरस्कार संस्थेला घोषित झाला. कोविड कालखंडात अत्यंत आव्हानात्मक स्थितीतही पतसंस्थेने अत्यंत जागृतपणे आपले अर्थकारण केले. संस्थेचे ठेवींमध्ये संस्थेच्या कर्ज विभागांमध्ये सातत्य राहिले. वसुलीसाठी सातत्याने केलेला पाठपुरावा व कर्जदारांची साथ यामुळे वसुलीचा विक्रमी आकडा कायम ठेवता आला.
संस्थेचा अध्यक्ष म्हणून यशाची चढती कमान, वृद्धिंगत होणारे अर्थकारण त्याचबरोबर वाढत जाणारी विश्वासार्हता याचे खूप समाधान आहे आणि मिळणारे हे पुरस्कार अधिक काम करण्यासाठी प्रेरणा देतात, असे भावोद्गार ॲड. पटवर्धन यांनी काढले.