बांगलादेशी घुसखोरी भारताला धोकादायक :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2016 01:14 AM2016-04-11T01:14:24+5:302016-04-11T01:14:48+5:30
हेमंत महाजन-हेडगेवार स्मृती व्याख्यानमाला
कोल्हापूर : बांगलादेशींचे भारतातील वास्तव्य दिवसें-दिवस वाढत आहे. प्रामुख्याने ही बांगलादेशी घुसखोरी ईशान्य भारताला धोकादायक असल्याचे मत भारतीय सैन्यदलाचे निवृत्त अधिकारी ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी कोल्हापुरात रविवारी व्यक्त केले. ते हिंदू व्यासपीठतर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक के.ब. हेडगेवार स्मृतिव्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफताना बोलत होते. शाहू स्मारक भवनात ही व्याख्यानमाला सुरू आहे.
हेमंत महाजन म्हणाले, सन १९३० पासून बांगलादेशी भारतात घुसखोरी होत आहे आणि ती आजही होत आहे. त्याला कारणीभूत म्हणजे येथील राज्यकर्ते होय. देशाची सुरक्षितता टिकविण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाने राजकारण न करता बांगलादेशी घुसखोरी रोखण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. विशेषत: ईशान्य भारताकडील आसाम, पश्चिम बंगाल, मणिपूर, मिझोराम अशा राज्यांना त्यांची घुसखोरी धोकादायक आहेत. पुढील काळात तर आसाम व पश्चिम बंगाल या राज्यात बांगलादेशी मुख्यमंत्री झाला तर आश्चर्य वाटायला नको. आता आसाममध्ये बांगलादेशमधून आलेली व्यक्ती आता खासदार आहेत.
यावेळी सुभाष वोरा, उदय सांगवडेकर यांच्यासह हिंदू व्यासपीठ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)