बेंगलोरचा संशयित फिरणारा प्रौढ ताब्यात

By admin | Published: March 10, 2016 10:55 PM2016-03-10T22:55:42+5:302016-03-11T00:02:21+5:30

स्टेट बँक आॅफ म्हैसूर येथील खाते पुस्तकावर रेड्डी रमेश के. एम. असे नाव असून, कोमासंदरा, डोमसंदरा बेंगलोर-कर्नाटक असा पत्ता, तिकीट व घराची चावी मिळाली

Banglore suspected wandering adults | बेंगलोरचा संशयित फिरणारा प्रौढ ताब्यात

बेंगलोरचा संशयित फिरणारा प्रौढ ताब्यात

Next

गुहागर : रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पाच्या एलएनजी जेटीजवळील समुद्रकिनाऱ्यावर आज (गुरुवारी) सकाळी संशयितरित्या फिरणाऱ्या एका प्रौढाला सीआयएसएफ जवानांनी गुहागर पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी या प्रौढाची चौकशी केल असता, त्याच्याकडे असलेल्या स्टेट बँक आॅफ म्हैसूर येथील खाते पुस्तकावर रेड्डी रमेश के. एम. असे नाव असून, कोमासंदरा, डोमसंदरा बेंगलोर-कर्नाटक असा पत्ता, तिकीट व घराची चावी मिळाली आहे. आपण महाराष्ट्र दर्शनासाठी आलो आहोत. माझ्याकडे ३ हजार रुपये होते ते संपले. मी बी. एसस्सी., बी. एड. ग्रॅज्युएट असून, दहावी इयत्तेसाठी सायन्स शिकवत असल्याचेही तो सांगत आहे. संपूर्ण चौकशी पूर्ण झाल्यानंतर तसेच मेडिकल तपासणीनंतर सदर प्रौढाबाबत खात्री पटल्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी सांगितले.
अधिक तपास गुहागर पोलीस करत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Banglore suspected wandering adults

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.