सभासदांच्या पाठबळावर बँक प्रगतिपथावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:27 AM2021-03-01T04:27:35+5:302021-03-01T04:27:35+5:30
जयसिंगपूर : भरत बँक सरकारी व व्यापारी बँका देत असलेल्या सर्व सुविधा देणारी तालुक्यातील एकमेव सहकारी बँक आहे. बँकेने ...
जयसिंगपूर : भरत बँक सरकारी व व्यापारी बँका देत असलेल्या सर्व सुविधा देणारी तालुक्यातील एकमेव सहकारी बँक आहे. बँकेने अल्पावधीतच यशाचे शिखर गाठले आहे. सभासदांचे पाठबळ आणि विश्वासावरच बँक प्रगतिपथावर आहे, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी केले.
येथील श्री भरत अर्बन को-ऑप. बँकेची ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोनाचे नियम पाळून नुकतीच पार पडली.
अशोक रुणवाल म्हणाले, बँकेस ऑडिट वर्ग अ मिळाला आहे. ठेवी १६७ कोटी ६१ लाख इतक्या झाल्या, तर कर्जामध्ये ९ कोटी ४८ लाखांची वाढ होऊन चालू आर्थिक सालात ९६ कोटी ७६ लाख इतकी कर्जे वाटप झाली आहेत. एनपीए १.२६, थकबाकी ३.७८ टक्के राहिली असून, नियमानुसार १६४.७५ लाख इतक्या तरतुदी करून निव्वळ नफा ८५ लाख ६० हजार झाला आहे. सभासदांनी सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली. संचालक प्रसन्न कुंभोजकर यांनी आभार मानले.
चौकट - ठेवीस विमा कवच
रिझर्व्ह बँकेकडून नागरी सहकारी बँका सक्षम व्यवस्थापनाखाली आणण्यासाठी केली जाणारी उपाययोजना काही प्रमाणात बँकांच्या फायद्याची, तर काही प्रमाणात बँकांच्या तसेच संचालकांच्या अधिकारामध्ये कपात करणारी आहेत. रिझर्व्ह बँक ठेवीदारांच्या हिताच्या दृष्टीने वेळोवेळी निर्णय घेते व ठेवीदारांना संरक्षण देते. त्यामुळे पाच लाखापर्यंतच्या ठेवीस विमा संरक्षण दिले असल्याचे उपाध्यक्ष डॉ. श्रीवर्धन पाटील यांनी सांगितले.