सांगली जिल्ह्यातील बँकांचा समन्वय कक्ष स्थापन करणार : समरजित घाटगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:30 AM2021-08-14T04:30:28+5:302021-08-14T04:30:28+5:30

अण्णासाहेब पाटील मागास विकास कर्ज योजनेसह इतर कर्ज योजनेतून मराठा समाजासह इतर अठरापगड जातीतील तरुणांना आर्थिक पाठबळ ...

Banking Coordinating Cell to be set up in Sangli District: Samarjit Ghatge | सांगली जिल्ह्यातील बँकांचा समन्वय कक्ष स्थापन करणार : समरजित घाटगे

सांगली जिल्ह्यातील बँकांचा समन्वय कक्ष स्थापन करणार : समरजित घाटगे

Next

अण्णासाहेब पाटील मागास विकास कर्ज योजनेसह इतर कर्ज योजनेतून मराठा समाजासह इतर अठरापगड जातीतील तरुणांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी प्रयत्न करू. त्यासाठी कोल्हापूरप्रमाणे सांगली जिल्ह्यातील नागरी बँकांचा समन्वय कक्ष स्थापन करण्यात येईल, असे प्रतिपादन कागलच्या शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी पत्रकार परिषदेत केले.

सांगली बँक असोसिएशन व कागलच्या राजे विक्रमसिंह घाटगे बॅंकेच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्ह्यातील १९ बँकांच्या प्रतिनिधींची बैठक आज घेण्यात आली. त्यानंतर घाटगे बोलत होते. कर्ज योजनांचा फायदा घेऊन तरुणांना व्यवसाय स्थापन करण्यास आर्थिक पाठबळ लाभावे यासाठी आज सांगली जिल्ह्यातील नागरी बँकांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी सर्वच बँकांनी यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात नेऊन तरुणांना व्यवसायासाठी शक्य ती सर्व मदत करण्याचा माझा प्रयत्न आहे.

सांगली जिल्हा बँक असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर जाधव, शामराव पाटील, दीपक शिंदे, गणेश गाडगीळ , विलास देसाई, संजय देसाई, प्रकाश पवार, वैभव धुमाळे, राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील, राजेंद्र जाधव, राजवर्धन नाईक-निंबाळकर आदी उपस्थित होते.

Web Title: Banking Coordinating Cell to be set up in Sangli District: Samarjit Ghatge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.