बेळगावात वीकेंड लॉकडाऊनमध्ये बँका बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:18 AM2021-06-03T04:18:40+5:302021-06-03T04:18:40+5:30
बेळगाव : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार येत्या शुक्रवारपासून सलग तीन दिवस शहरासह जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन असले आणि या काळात बँका जरी ...
बेळगाव : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार येत्या शुक्रवारपासून सलग तीन दिवस शहरासह जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन असले आणि या काळात बँका जरी बंद असल्या तरी एटीएम मात्र सुरू राहणार असल्याची माहिती लीड बँकेच्या व्यवस्थापकांनी प्रसिद्धीस दिली आहे.
जिल्ह्यातील नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येतील चिंताजनक वाढ अद्यापही कायम असल्यामुळे बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी वीकेंड लाॅकडाऊनचा कालावधी वाढवताना येत्या शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून शनिवार, रविवार आणि सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत म्हणजे सलग तीन दिवस कडक लाॅकडाऊनचा आदेश जारी केला आहे. या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत. तसेच या काळात बँकाही बंद राहणार आहेत. मात्र, नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी एटीएम मात्र सुरू राहणार आहेत, अशी माहिती लीड बँकेच्या व्यवस्थापकांनी दिली आहे.