गेटबाहेरूनच बाप्पांचे दर्शन, अंगारकी संकष्टीला मंदिर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:43 AM2021-03-04T04:43:43+5:302021-03-04T04:43:43+5:30
कोल्हापूर : अंगारकी संकष्टीला नागरिकांनी बंद मंदिराच्या गेटबाहेरूनच गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने बिनखांबी ...
कोल्हापूर : अंगारकी संकष्टीला नागरिकांनी बंद मंदिराच्या गेटबाहेरूनच गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने बिनखांबी गणेश मंदिर व ओढ्यावरील सिद्धिविनायक मंदिर बंद ठेवले होते. मंदिरातच पुजाऱ्यांनी सर्व धार्मिक विधी पार पाडले.
मंगळवारी येणाऱ्या अंगारकी संकष्टीचे विशेष महत्त्व आहे. दर महिन्याला येणाऱ्या संकष्टीला जे नागरिक उपवास करत नाहीत तेदेखील आवर्जून या दिवशी व्रतस्थ राहतात. ही संकष्टी वर्षातून दोन ते तीनदाच येते. त्यामुळे या दिवशी गणेश मंदिरांमध्ये भाविकांचीही मोठी गर्दी असते. वाढत्या कोरोना संसर्गामुळे जिल्हा प्रशासनाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला धार्मिक स्थळांच्या ठिकाणी गर्दी होऊ नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत त्यामुळे समितीने बिनखांबी व ओढ्यावरील गणेश मंदिर मंगळवारी बंद ठेवले होते. त्यामुळे भाविकांनी मंदिराबाहेरूनच बाप्पाला नमस्कार केला.
---
फोटो नं ०२०३२०२१-कोल-अंगारकी०१,
ओळ : अंगारकी संकष्टीनिमित्त मंगळवारी कोल्हापुरातील ओढ्यावरील गणेश मंदिरात श्रींची विशेष सालंकृत पूजा बांधण्यात आली होती. (छाया : नसीर अत्तार )
--
०२
मंदिर बंद असल्याने भाविकांनी गेटबाहेरूनच बाप्पाला नमस्कार केला. (छाया : नसीर अत्तार)
--