बार असोसिएशनची दुसऱ्यांदा निवडणूक लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:18 AM2021-06-03T04:18:21+5:302021-06-03T04:18:21+5:30

कोल्हापूर : कोरोनामुळे कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनची निवडणूक सलग तिसऱ्या वर्षी लांबणीवर पडली आहे. यामुळे विद्यमान पदाधिकारीच कार्यरत राहणार ...

Bar Association's second election postponed | बार असोसिएशनची दुसऱ्यांदा निवडणूक लांबणीवर

बार असोसिएशनची दुसऱ्यांदा निवडणूक लांबणीवर

googlenewsNext

कोल्हापूर : कोरोनामुळे कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनची निवडणूक सलग तिसऱ्या वर्षी लांबणीवर पडली आहे. यामुळे विद्यमान पदाधिकारीच कार्यरत राहणार आहेत. कोरोना कमी झाल्यावर ऑगस्टनंतरच निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. राज्यभरातील बार असोसिएशनच्या निवडणुकाही लांबणीवर पडल्या आहेत.

येथील बार असोसिएशनची मुदत एक वर्षाची असते. प्रत्येक वर्षी ३० एप्रिलला विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्याने निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. मार्च २०१९ मध्ये असोसिएशनच्या १५ जागांसाठी निवडणूक झाली होती. चुरशीच्या निवडणुकीनंतर अध्यक्षपदी रणजित गावडे, उपाध्यक्षपदी जयेंद्र पाटील, आदी पदाधिकारी कार्यरत झाले. त्यानंतर मार्च २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग शहर आणि जिल्ह्यात सुरू झाला. जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी केली. यामुळे त्यावर्षी निवडणूक झाली नाही. अजूनही त्याचा फैलाव कायम असल्याने पुन्हा सलग दुसऱ्यावर्षी निवडणूक लांबणीवर पडली. जिल्ह्यात बार असोसिएशनचे तीन हजार वकील सभासद आहेत. यांना निमंत्रित करून सर्वसाधारण सभा घेणे आणि निवडणूक प्रक्रिया राबविणे कोरोनामुळे अशक्य आहे. म्हणून यावर्षीही ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत निवडणूक होणार नाही. ऑगस्टनंतर कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यास निवडणूक होणार आहे, अशी माहिती बार असोसिएशनचे अध्यक्ष रणजित गावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title: Bar Association's second election postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.