‘बार कौन्सिल’ची मतमोजणी अनिश्चित काळासाठी स्थगित, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 05:32 PM2018-10-27T17:32:33+5:302018-10-27T17:35:00+5:30
बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅँड गोवा (बी.सी.एम.जी) यासाठी मुंबईत शनिवारी सुरू असलेल्या मतमोजणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. याबाबतचे आदेश जारी केल्यानंतर दुपारी मतमोजणी थांबविण्यात आली. ती अनिश्चित काळासाठी स्थगित केल्याचा आदेश न्यायालयाने दिला. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ उमेदवारांनी ही निवडणूक लढविली.
कोल्हापूर : बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅँड गोवा (बी.सी.एम.जी) यासाठी मुंबईत शनिवारी सुरू असलेल्या मतमोजणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. याबाबतचे आदेश जारी केल्यानंतर दुपारी मतमोजणी थांबविण्यात आली. ती अनिश्चित काळासाठी स्थगित केल्याचा आदेश न्यायालयाने दिला. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ उमेदवारांनी ही निवडणूक लढविली.
बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅँड गोवा निवडणुकीसाठी २८ मार्च २०१८ रोजी २५ जागांसाठी मतदान झाले. ही निवडणूकसर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे होत आहे. या निवडणुकीची मतमोजणीची अंतिम प्रक्रिया शनिवारी मुंबईत सुरू होती. कोल्हापुरातून अॅड. विवेक घाटगे यांच्यासह नऊजणांनी उमेदवारांनी ही निवडणूक लढविली आहे.
या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अॅड. चरणजित चंदरपाल या उमेदवाराने मतमोजणीबाबत हरकत घेतली होती. त्याबाबतचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाकडे त्यांनी दिला होता. यावर शनिवारी मतमोजणीदिवशी न्यायालयाने मतमोजणीला स्थगिती दिली. या आदेशाची प्रत बीसीएमजीचे विशेष समितीचे चेअरमन दत्तप्रसाद लावंदे यांना देण्यात आली आहे.
दरम्यान, बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅँड गोवा निवडणुकीच्या मतमोजणीला स्थगिती दिल्यामुळे दिल्ली व केरळ येथील बार कौन्सिलच्या मतमोजणीला स्थगिती न्यायालयाने स्थगिती दिली.