बसचालक मतदान हक्कापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 12:49 AM2019-04-09T00:49:43+5:302019-04-09T00:49:48+5:30

भारत चव्हाण । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लोकशाहीत मतदानाचा सर्वांनाच कायदेशीर हक्कप्राप्त झाला आहे. सगळेच हा हक्कबजाविताना पाहतो; ...

Basant deprived of voting rights | बसचालक मतदान हक्कापासून वंचित

बसचालक मतदान हक्कापासून वंचित

googlenewsNext

भारत चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : लोकशाहीत मतदानाचा सर्वांनाच कायदेशीर हक्कप्राप्त झाला आहे. सगळेच हा हक्कबजाविताना पाहतो; परंतु प्रत्यक्ष मतदानाच्या आदल्या दिवशी मतदान केंद्रांवर तसेच मतदान झाल्यानंतर मतदान केंद्रापासून गोदामापर्यंत ईव्हीएम आणून ठेवण्यात महत्त्वाची कामगिरी बजावितात अशा एस. टी. महामंडळाच्या हजारो चालक, वाहकांना मतदानापासून वंचित राहावे लागते. तेव्हा आम्हालाही मतदानाचा हक्कबजावता येईल, अशी व्यवस्था करावी, अशी मागणी काही चालक, वाहकांनी सोमवारी ‘लोकमत’ प्रतिनिधीकडे केली.
‘लोकमत आॅन द व्हील’ या उपक्रमांतर्गत लोकमत प्रतिनिधीने कोल्हापूर राधानगरी एस. टी. बसमधून प्रवास केला, त्यावेळी चालक, वाहकांनी ही मागणी केली. त्यांच्या या मागणीचा राज्य निवडणूक आयोगाने एस.टी.च्या ड्यूटीवर असणाऱ्या चालक, वाहकांना मतदान करण्यात येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्तकेली.
निवडणूक प्रक्रियेचा भाग बनून मतदान केंद्रापर्यंत कर्मचारी, ईव्हीएम आणि तत्सम साहित्य पोहोचविण्याचे तसेच मतदान झाल्यानंतर कर्मचाऱ्यांसह ईव्हीएम निश्चित केलेल्या गोदामापर्यंत आणून संबंधितांच्या ताब्यात देण्याचे काम एसटीचे चालक, वाहक करत असतात. एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणापर्यंत जाताना हे कर्मचारी पुन्हा लगेच माघारी येत नाहीत. रात्री उशिरा ईव्हीएम घेऊनच येतात; त्यामुळे ते राहत असलेल्या घराजवळील मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे शक्य होत नाही. केवळ मतदानासाठी एक टोकापासून घरापर्यंत येणे आणि पुन्हा ड्यूटीवर जाणे शक्य होत नाही; त्यामुळे बºयाच निवडणुकीत या कर्मचाºयांना मतदान करता येत नाही. इच्छा असूनही राष्टÑीय कर्तव्य पार पाडता येत नाही. आपण ड्यूटी असल्याने मतदानापासून वंचित राहिल्याचे शल्य पुढे काही दिवस त्यांच्या मनात घर करून राहते. या विषयाला सोमवारी काही चालक, वाहकांनी हात घातला.

Web Title: Basant deprived of voting rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.