शंभर वृक्षलागवडीचा संकल्प पूर्ण करतेय ‘आधार’

By admin | Published: May 14, 2017 01:02 AM2017-05-14T01:02:02+5:302017-05-14T01:05:02+5:30

पाटण येथील ‘आधार’ संस्थेच्या सदस्यांनी जगविली झाडे : सत्तर वर्षीय आजोबांसह तरुण सदस्यही सहभागी

'Base' fulfilling the resolution of 100 trees | शंभर वृक्षलागवडीचा संकल्प पूर्ण करतेय ‘आधार’

शंभर वृक्षलागवडीचा संकल्प पूर्ण करतेय ‘आधार’

Next


प्रवीण जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटण : शासनाने मोठी जाहिरातबाजी करून संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी दोन कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प केला. पंरतु झाडे लावली म्हणजे संकल्प पूर्ण होतोय असे दिसत नाही. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी सातत्य असावे लागते ते सातत्य मार्चपासून आजपर्यंत पाटणमधील ‘आधार’ सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी राखले आहे. या संस्थेच्या तीस ते चाळीस सदस्यांनी दर रविवारी हातात बादली, घागर घेऊन सकाळी सात ते नऊ यावेळेत शंभर रोपांना पाणी देऊन ती रोपे जगवली आहेत. ही संस्था नेहमीच पाटणमध्ये आणि तालुक्यात समाजकार्यात सामाजिक बांधिलकी जपून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण करत आहे.
दिवसेंदिवस पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनत आहे. आपल्या पूूर्वजांनी लावलेल्या वृक्षांच्यामुळे आज आपण शुद्ध हवा घेत आहोत. आपल्या भोवतालचा निसर्ग संपत्तीचा ठेवा पूर्वजांनी आपणाला दिला आणि तो ठेवा आपण पुढच्या पिढीला देण्याच्या उद्देशानेच पाटण शहरामध्ये वीरशैव लिंगायत स्मशानभूमीत ‘आधार’ सामाजिक संस्थेने शंभर विविध जातींची रोपे लावून ती जगविण्याचा संकल्प आधार सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी केला.
वातावरणात वाढलेल्या तापमानामुळे आणि कडक उन्हामुळे लावलेली झाडे सुकून जाऊ नये म्हणून आधार संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहिते आणि सदस्य सोमनाथ आग्रे, सुरेश चव्हाण, सुरेश क्षीरसागर, सुरेश काणे, डॉ. साठे, स्वप्नील नेवरेकर, प्रमोद पाटेकर, लक्ष्मण पाटील, दादासाहेब जाधव, शेखर धामणकर, एकनाथ मुळे, नंदकुमार शेडगे, इक्बाल हकीम, सुनील फाटक यांच्याबरोबरच जवळपास आधार संस्थेचे पदाधिकारी आणि चाळीसहून अधिक सदस्यांनी स्मशानभूमीत श्रमदान करून लावलेल्या झाडांना पाणी घालून ती झाडे जगविण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. तर विशेष म्हणजे आधार सामाजिक संस्थचे एकनाथ मुळे यांचे वय हे ७१ असून देखील ते या तरुणांच्याबरोबर दर रविवारी पाण्याची घागर घेऊन झाडांना पाणी देण्यासाठी वेळेवर उपस्थित राहत आहेत.


आमच्या ‘आधार’ संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य नेहमीच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काम करत असतात. समाजातील गरजू लोकांना ‘आधार’ हात देते. याबरोबरच वातावरणातील वाढते तापमान लक्षात घेता नुसते झाड लावून आपले काम संपत नाही तर ते जगविण्याची जबाबदारी देखील आपल्या सर्वांची आहे. याच भावनेतून आम्ही संस्थेचे सदस्य काम करत आहे.
- अनिल मोहिते, अध्यक्ष, आधार सामाजिक संस्था, पाटण

Web Title: 'Base' fulfilling the resolution of 100 trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.