मंडलिकांचे मूलभूत कार्य दीपस्तंभासारखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:46 AM2021-03-13T04:46:11+5:302021-03-13T04:46:11+5:30

म्हाकवे : शाश्वत लोककल्याणाचा ध्यास घेऊन दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांनी पाणी, शिक्षण आणि शेती या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य ...

The basic function of a church is like a beacon | मंडलिकांचे मूलभूत कार्य दीपस्तंभासारखे

मंडलिकांचे मूलभूत कार्य दीपस्तंभासारखे

Next

म्हाकवे : शाश्वत लोककल्याणाचा ध्यास घेऊन दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांनी पाणी, शिक्षण आणि शेती या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. त्यांचे हे कार्य दीपस्तंभासारखे आहे, असे गौरवोद्गार डॉ. शिवाजीराव होडगे यांनी केले. राजकारणातील दरारा, त्यांचे अलौकिक व्यक्तिमत्त्व आणि संघर्षमय परिस्थितीतही लोककल्याणाचा वसा जपला. त्यांच्या विचारांचा जागर नव्या पिढीने करावा.

हमिदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक कारखाना कार्यस्थळावर लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संचालक वीरेंद्र मंडलिक होते.

स्व. मंडलिक यांनी आम्हा कुटुंबीयांपेक्षा सर्वाधिक प्रेम कार्यकर्त्यांना दिले. त्यांच्या विचारांची वीण आजही भक्कम आहे. त्यामुळेच मंडलिक गटाचे वलय कायम राहिले असल्याचे वीरेंद्र मंडलिक यांनी सांगितले.

प्रास्ताविक मधुकर भोसले यांनी केले. यावेळी हिरा शुगरचे संचालक समगोंडा आरभावी व गडहिंग्लज राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बसवराज आजरी यांनी मनोगते व्यक्त केले. कारखान्याचे उपाध्यक्ष बंडोपंत चौगुले, संताजी घोरपडे कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, जि.प.चे सदस्य युवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैय्या माने, बिद्री कारखान्याचे संचालक विजयसिंह मोरे, संचालक प्रवीणसिंह भोसले, सभापती पूनम महाडिक, संचालक, मंडलिक प्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी शाहू साखरचे उपाध्यक्ष बाळ घोरपडे, राजे बँकेचे अध्यक्ष एम.पी. पाटील यासह पदाधिका-यांनी मंडलिकांना आदरांजली वाहिली.

स्वागत कार्यकारी संचालक एन.वाय. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अविनाश चौगले यांनी केले.

चौकट- स्व. मंडलिकांच्या पुरोगामित्वाचा वारसा चालवूयाः मुश्रीफ

कोल्हापूर ही छत्रपती शाहू महाराजांची पुरोगामित्वाची भूमी आहे. यामध्ये स्व. मंडलिकांनी पुरोगामित्वाचा वारसा आयुष्यभर जपला. तो वारसा आपणही पुढे नेऊया, असे आवाहन नवीद मुश्रीफ यांनी केले.

चौकट-

गावचा प्रमुख हवा मंडलिक गटाचा...

कागलमध्ये मंडलिक गटाचे उपसरपंच अधिक आणि सरपंचांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे गावचा प्रमुख हा आपल्या गटाचा असावा, यासाठी यापुढे प्रयत्न करावेत, असे आवाहनही वीरेंद्र मंडलिक यांनी केले.

कॅप्शन

लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. शिवाजीराव होडगे, यावेळी वीरेंद्र मंडलिक, बंडोपंत चौगुले, विजयसिंह मोरे

२) हमिदवाडा कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर त्यांना अभिवादन करताना वीरेंद्र मंडलिक, बंडोपंत चौगुले, आर. डी. पाटील, पूनम महाडिक आदी.

छाया-जे. के. सुरुपली

Web Title: The basic function of a church is like a beacon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.