प्राचार्यांचे मूळ वेतन पूर्वलक्षी प्रभावाने निश्चित होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:23 AM2021-02-12T04:23:26+5:302021-02-12T04:23:26+5:30
चर्चा करून हे प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रयत्नाअंतर्गत मंत्री सामंत यांच्या कक्षामध्ये बैठक घेण्यात आली. ...
चर्चा करून हे प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रयत्नाअंतर्गत मंत्री सामंत यांच्या कक्षामध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी मंत्री अदिती तटकरे, खासदार मंडलिक, आमदार जयंत आसगावकर प्रमुख उपस्थित होते. प्राचार्यांची नियुक्ती पाच वर्षांच्या निश्चित कालावधीसाठी करण्याचा निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणेच प्राचार्यांची नियुक्ती त्यांच्या सेवानिवृत्ती वयापर्यंत संस्थाचालकांच्या सहमतीने राहील. त्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. प्राचार्यांची २६० पदे भरण्याचा आदेश काढला असून उर्वरित ३२५ रिक्त पदे लवकर भरण्याबाबत मान्यता देत असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत वित्त विभागाकडे खास बाब म्हणून परवानगी मागण्यासाठी वित्तमंत्री यांच्यासोबत बैठक आयोजित करून हा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. सध्या बीसीए, एम. एस्सी. (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांसाठी एनटी, ओबीसी आणि खुल्या वर्गातील आर्थिक मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्याच्या दृष्टीने वित्त विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग व सामाजिक न्याय विभाग यांची संयुक्त समिती नेमून याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
या बैठकीस डॉ. प्रताप पाटील, पी. जी. शिंदे, प्रताप माने, प्राचार्य क्रांतिकुमार पाटील, चिमण डांगे, डी. आर. मोरे, धैर्यशील पाटील, आदी उपस्थित होते. आमदार प्रकाश आबिटकर हे ऑनलाईन सहभागी झाले.
चौकट
अधिवेशनानंतर पुन्हा बैठक
खासदार मंडलिक आणि प्राचार्य, संस्थाचालकांच्या शिष्टमंडळाने काही विषयांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. या विषयावर अधिवेशनानंतर पुन्हा बैठक घेतली जाईल. त्यामध्ये प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आर्थिक तरतुदी करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे आश्वासन पवार यांनी दिले.
फोटो (११०२२०२१-कोल-प्राचार्य बैठक०१ व ०२) : विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मुंबईत गुरुवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्राचार्य, संस्थाचालकांसमवेत चर्चा केली. यावेळी शेजारी खासदार संजय मंडलिक, प्राचार्य क्रांतिकुमार पाटील, संस्थाचालक प्रताप माने, डॉ. प्रताप पाटील, आदी उपस्थित होते.