तिरंग्यात झळकणार तुळशीचे पाणी, १५ ऑगस्टला विद्युत रोषणाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 11:53 AM2020-08-14T11:53:02+5:302020-08-14T11:54:51+5:30

कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणाच्या दरवाजावर केलेल्या नयनरम्य विद्युत रोषणाईच्या धर्तीवर धामोड (ता. राधानगरी) येथील तुळशी जलाशयाच्या दरवाजावरही १५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. शाखा अभियंता विजय  आंबोळे यांच्या कल्पनेतून हा प्रयोग राबवला जाणार आहे.

Basil water to shine in the triangle! | तिरंग्यात झळकणार तुळशीचे पाणी, १५ ऑगस्टला विद्युत रोषणाई

तिरंग्यात झळकणार तुळशीचे पाणी, १५ ऑगस्टला विद्युत रोषणाई

Next
ठळक मुद्देतिरंग्यात झळकणार तुळशीचे पाणी१५ ऑगस्टला विद्युत रोषणाई

श्रीकांत ऱ्हायकर

धामोड- कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणाच्या दरवाजावर केलेल्या नयनरम्य विद्युत रोषणाईच्या धर्तीवर धामोड (ता. राधानगरी) येथील तुळशी जलाशयाच्या दरवाजावरही १५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. शाखा अभियंता विजय  आंबोळे यांच्या कल्पनेतून हा प्रयोग राबवला जाणार आहे.

धामोड ( ता.राधानगरी) येथील ३.४७ टीएमशी पाणी साठवण क्षमता असलेला तुळशी मध्यम प्रकल्पात ९० टक्के इतका पाणी साठा झाला आहे. सद्या परिसरात पावसाचे प्रमाणही मोठे असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याचा विचार करता व पूरस्थितीचा विचार करून पंधरा ऑगस्टच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ .३० वाजता धरणाच्या तीनही वक्रदरवाजातून पाणी सोडण्यात येणार आहे.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या धरणाच्या तीन वक्र दरवाजावर अलमट्टी धरणावर केलेल्या विद्युत रोषणाईच्या धर्तीवर तिन रंगात एलईडी ( हायमास्क ) बल्बचा प्रकाशझोत टाकण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे तुळशीतील पाणी तिरंग्याच्या रंगात झळकणार आहे. 


धामोडमधील सर्व पत्रकार बंधु व पाटबंधारेचे सर्व अधिकारी यांच्या कल्पनेतून हा प्रयोग पूढे आला. यासंबंधीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सायंकाळी तिरंग्याच्या रंगातील पाणी नदीपात्रात सोडण्याचा प्रयत्न राहील.
- विजय आंबोळे,
शाखा अभियंता, तुळशी धरण.

Web Title: Basil water to shine in the triangle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.