धनगरवाड्या-वस्त्यांना जनकल्याणसह निलंयमचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 01:52 PM2020-04-24T13:52:10+5:302020-04-24T13:55:10+5:30
गेल्या दोन दिवसांत राधानगरीतील वाड्या व कोल्हापूर शहरातील काही वसाहतींमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या ५०० किटचे मोफत वाटप केले.
कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे दुर्गम भागांतील वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. ही बाब ध्यान घेऊन कोल्हापूरच्या जनकल्याण समिती व निलंयम सेवा समितीतर्फे गेल्या दोन दिवसांत राधानगरीतील वाड्या व कोल्हापूर शहरातील काही वसाहतींमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या ५०० किटचे मोफत वाटप केले.
राधानगरी तालुक्यासह अन्य दुर्गम भागांतील नागरिकांना लॉकडाऊनमुळे तालुक्याच्या ठिकाणी जाता येत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. ही बाब ध्यानी घेऊन समितीतर्फे राधानगरी तालुक्यातील आसनगाव, फराळवाडी, भिवाचा खोल, वानरमारी वसाहत, रमणवाडा आदी दुर्गम वाड्या-वस्त्यांसह शहरातील दौलतनगर, यादवनगर आदी परिसरात जीवनावश्यक वस्तूंची ५०० किटचे वाटप करण्यात आले. ही किट गेल्या दोन दिवसांपासून समितीचे अध्यक्ष अमर पारगांवकर, सौरभ फळणीकर, ऐश्वर्या मुनिश्वर कार्यरत आहेत.