सोशल मीडियाचा आधार

By admin | Published: September 20, 2014 12:15 AM2014-09-20T00:15:42+5:302014-09-20T00:29:43+5:30

आता मोबाईलवरच आदेश : एका क्षणात कर्मचाऱ्यांशी संपर्क

The basis of social media | सोशल मीडियाचा आधार

सोशल मीडियाचा आधार

Next

कोल्हापूर : कमी वेळेत निवडणूक कामातील सर्व कर्मचाऱ्यांना बिनचूक निरोप देणे म्हणजे जिल्हा प्रशासनासमोर एक प्रकारचे दिव्य असायचे. वेळेत निरोप पाठविणे म्हणजे अवघड गोष्ट व्हायची; परंतु आता या अडचणीवर जिल्हा प्रशासनाने मात केली आहे. योग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांपर्यंत अतिशय कमी वेळात जलद निरोप पोहोचविण्यासाठी ‘सोशल मीडिया’चा वापर प्रभावीपणे करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे जसे कर्मचाऱ्यांना तत्काळ निरोप देता येईल, तसेच कर्मचाऱ्यांकडूनही जिल्हा प्रशासनाला मतदान केंद्रनिहाय माहिती मिळण्यास सुलभ झाले आहे. या नेटवर्कमध्ये जिल्हाधिकाऱ्यांपासून शेवटच्या कर्मचाऱ्यांपर्यत सुमारे दहा हजार कर्मचारी जोडले गेले आहेत.
सोशल मीडियाचा गैरवापरच अधिक होत असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळत असल्या, तरी जिल्हा प्रशासनाने त्याचा निवडणुकीसारख्या अवघड परंतु चांगल्या कामासाठी वापर करायचे ठरविले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात त्याचे एक नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून, तेथेच सर्व्हर जोडण्यात आला आहे. जिल्ह्यात ३११५ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर पाच ते सहा कर्मचारी काम करणार आहेत.
एसएमएस मॉनिटरिंग अँड कम्युनिकेशन प्लॅन अंतर्गत स्थापन झालेल्या समितीचे काम प्रत्यक्ष सुरूही झाले आहे. समितीचे नोडल आॅफिसर म्हणून मनपाचे सहायक आयुक्त उमेश रणदिवे, तर त्यांना सहायक म्हणून राजीव आवास योजना विभागाचे प्रसाद संकपाळ काम पाहणार आहेत. निवडणूक कामात नियुक्त करण्यात आलेल्या दहा हजार कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक त्यांच्याकडे आहेत. या कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून निरोप दिले जातील. तसेच त्यांच्याकडूनही प्रशासनाला फिडबॅक मिळणार आहे. निरोपांसह प्रत्येक दोन तासांनी मतदान कें द्रावर किती मतदान झाले. त्यामध्ये महिला व पुरुष किती? यांची आकडेवारी कळवायची आहे. ही सर्व आकडेवारी सर्व्हरक डे पोहोचणार आहे. त्यासाठी वेगळा डाटा करण्याची आवश्यकता भासणार नाही. एका क्षणात कोणत्या मतदान केंद्रावर किती मतदान झाले, इथपासून जिल्ह्यात किती मतदान झाले याची माहिती मिळणार आहे. (प्रतिनिधी)


आता लेखी आदेश नाहीत
यापूर्वी कर्मचाऱ्यांना लेखी आदेश दिले जात असत. परंतु आता यापुढे कर्मचाऱ्यांना त्यांच्या मोबाईलवरच आदेश दिले जातील. मतदान प्रशिक्षणाला उपस्थित राहण्याचे आदेश मोबाईलवर त्यांना मिळतील. प्रत्येक मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनासुद्धा अशाच प्रकारे सूचना व निरोप दिले जाणार आहेत.

कर्मचारी करीत आहेत काम
नॅशनल इन्फर्मेटिक सेंटरमधील साठ आणि एसएमएस कम्युनिकेशन प्लॅनचे पाच कर्मचारी सध्या या नव्या पद्धतीवर काम करीत आहेत. शनिवारी या संदर्भात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Web Title: The basis of social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.