Lok Sabha Election 2019 देशभरातील दिग्गजांची शेट्टींसाठी ‘बॅटिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 01:09 AM2019-04-11T01:09:35+5:302019-04-11T01:09:51+5:30

कोल्हापूर : खासदार राजू शेट्टी यांच्यासह ‘स्वाभिमानी’च्या पीचवर पुढील आठवड्यापासून देशभरातील दिग्गज प्रचारातून जोरदार ‘बॅटिंग’ करताना दिसणार आहेत. याची ...

'Batting' for veterans across the country | Lok Sabha Election 2019 देशभरातील दिग्गजांची शेट्टींसाठी ‘बॅटिंग’

Lok Sabha Election 2019 देशभरातील दिग्गजांची शेट्टींसाठी ‘बॅटिंग’

Next

कोल्हापूर : खासदार राजू शेट्टी यांच्यासह ‘स्वाभिमानी’च्या पीचवर पुढील आठवड्यापासून देशभरातील दिग्गज प्रचारातून जोरदार ‘बॅटिंग’ करताना दिसणार आहेत. याची सुरुवात मंगळवार (दि. १६) पासून राज ठाकरे यांच्या जाहीर सभेने होत आहे. पाठोपाठ दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांच्यासह उत्तर भारतातील शेतकरी नेते मतदारसंघात ठाण मारून प्रचारसभा गाजविणार आहेत.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांनाही आणण्याचे नियोजन जोरात सुरू आहे. १६ ते २० एप्रिल या कालावधीत या सर्व सभा घेऊन शेवटच्या पाच दिवसांत धुरळा उडवून देण्याचे धोरण आहे.
खासदार शेट्टी यांची ओळख ‘देशपातळीवरील शेतकऱ्यांचा नेता’ म्हणून झाली असल्याने त्यांच्या प्रचारासाठी देशभरातील शेतकरी नेते मतदारसंघात येत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले अखिल भारतीय किसान सभेचे नेते योगेंद्र यादव, राजेश टिकैत, रामपाल जाटही पुढील आठवड्यात मतदारसंघात येत आहेत. ते सांगली व हातकणंगले मतदारसंघांसाठी प्रचारसभा घेणार आहेत.
अभिनेते जयकांत शिकरे ऊर्फ प्रकाश राज यांच्यासह प्रसिद्ध वकील व शेतकरी नेते प्रशांत भूषण हेदेखील प्रचारासाठी येत आहेत. तत्पूर्वी १६ ला राज ठाकरे यांची इचलकरंजी येथे दोन्ही मतदारसंघांसाठी एकत्रित जाहीर सभा होणार आहे. यानिमित्ताने राज ठाकरे पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या व्यासपीठावर दिसणार आहेत. यांच्या जोडीला राज्यातील नेतेही सहभागी होत आहेत.
त्यात खासदार उदयनराजे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याही सभा होणार आहेत.
पेठवडगावमध्ये उद्या शरद पवारांची सभा
उद्या, शुक्रवारी सायंकाळी पेठवडगावमध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची जाहीर सभा होत आहे. आतापर्यंत शेट्टी यांच्यावर टीका करणारे पवार यावेळी शेट्टींसाठी मते मागणार असल्याने पहिल्याच जाहीर सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गांधी कुटुंबीयांना सभेला आणण्यासाठी नियोजन सुरू आहे. मतदारसंघात प्रियंका अथवा राहुल गांधी यांची सभा होणार आहे.

Web Title: 'Batting' for veterans across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.