कोरोना विरुद्धची लढाई अंतिम टप्प्यात..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:23 AM2021-05-22T04:23:54+5:302021-05-22T04:23:54+5:30
सोमवारपासून लाॅकडाऊन शिथिल; कागल येथे बैठक कागल : काही युरोपियन राष्ट्रांनी लसीकरण मोठ्या प्रमाणात केले आहे. ते ...
सोमवारपासून लाॅकडाऊन शिथिल; कागल येथे बैठक
कागल :
काही युरोपियन राष्ट्रांनी लसीकरण मोठ्या प्रमाणात केले आहे. ते आता कोरोनातून मुक्त होऊ लागले आहेत. आपल्या देशाची लोकसंख्या मोठी आहे, पण महाराष्ट्र शासनाप्रमाणे अनेक राज्य व मोठ्या महानगरपालिका जागतिक निविदा काढून लस मिळविण्याचा विचार करीत आहेत. यातून देशात जास्तीत जास्त लसीकरण होईल. आता ही कोरोना विरुद्धची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कागल कोविड केअर सेंटरमध्ये कागल तालुका कोरोना आढावा बैठकीत मंत्री मुश्रीफ बोलत होते.
यावेळी मंत्री हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने २५ ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन या केंद्राला देण्यात आली. यावेळी गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ, जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने, युवराज पाटील, चद्रंकात गवळी, नगराध्यक्षा माणिक माळी, सभापती पूनम महाडिक, प्रकाश गाडेकर, प्रवीण काळबर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रांताधिकारी प्रसेन्नजीत प्रधान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता पाटील, मुख्याधिकारी पंडित पाटील, कागल कोविड केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उल्का चरापले, पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, विकास बडवे आदी शासकीय अधिकारी उपस्थित होते.
● लसीकरणात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर ..
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, लसीकरणात महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरेल असे नियोजन केले आहे. राज्य ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३० हजार मेट्रिक टन पूर्ततेचा निर्धार केलेला आहे. कागल ग्रामीण रुग्णालयात तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभा राहत आहे. तिसऱ्या लाटेपूर्वी सर्व दक्षता घेऊया.
फोटोओळी.........
कागल येथील केअर सेंटरला दहा ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन्स ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, युवराज पाटील, भय्या माने, नविद मुश्रीफ व इतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते डाॅ. उल्का चरापले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.