भीमा-कोरेगाव येथील लढाई क्रांतिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:24 AM2021-01-03T04:24:13+5:302021-01-03T04:24:13+5:30
कोल्हापूर : भीमा-कोरेगाव येथील महार समाजाची झालेली लढाई क्रांतिकारी असल्याचे प्रतिपादन भाकपचे सतीशचंद्र कांबळे यांनी केले. शाहू समाधीस्थळ सहभाग ...
कोल्हापूर : भीमा-कोरेगाव येथील महार समाजाची झालेली लढाई क्रांतिकारी असल्याचे प्रतिपादन भाकपचे सतीशचंद्र कांबळे यांनी केले. शाहू समाधीस्थळ सहभाग कृती समितीच्यावतीने सिद्धार्थनगर येथे शौर्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
ते म्हणाले, पेशव्यांनी महार समाजावर खूप मोठा अन्याय व अत्याचार केला. या समाजाला त्यांनी गुलामगिरीच्या जोखडात अडकून ठेवलेले होते. त्यामुळे समाजाने या जोखडातून मुक्त करावे, अशाप्रकारची मागणी त्यांच्याकडे केली होती. परंतु पेशव्यांनी ती मागणी फेटाळली. त्यामुळे अन्यायाविरुद्ध त्वेषाने पेटून उठलेल्या महार समाजाने ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यामध्ये दाखल होऊन ५०० महार सैन्याने २८ हजार पेशव्यांच्या सेनेचा पराभव केला. प्रा. शहाजी कांबळे, कृती समितीचे निमंत्रक संजय माळी, स्वाती काळे, सुशील कोल्हटकर, वसंतराव लिंगनूरकर, माजी नगरसेवक जय पटकारे, महेश बावडेकर, बाळासाहेब भोसले, धनंजय सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.
फोटो : ०१०१२०२० कोल सतीश कांबळे न्यूज
ओळी : शाहू समाधीस्थळ सहभाग कृती समितीच्यावतीने सिद्धार्थनगर येथे शौर्य दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सतीशचंद्र कांबळे, प्रा. शहाजी कांबळे, माजी नगरसेवक जय पटकारे, संजय माळी, वसंत लिंगनूरकर आदी उपस्थित होते.