उदगाव जिल्हा परिषदेत तीन नेत्यांची लढाई

By admin | Published: February 9, 2017 10:12 PM2017-02-09T22:12:58+5:302017-02-09T22:12:58+5:30

स्वाभिमानी, राष्ट्रवादी-काँग्रेस, शिवसेनेत लढत : उदगाव-अर्जुनवाड पं. स.साठी उमेदवारांची घालमेल

The battle of three leaders in the Uda Nagar District Council | उदगाव जिल्हा परिषदेत तीन नेत्यांची लढाई

उदगाव जिल्हा परिषदेत तीन नेत्यांची लढाई

Next

संतोष बामणे --जयसिंगपूर --शिरोळ तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला असलेल्या उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात नवख्यांची गर्दी होत असल्यामुळे तिरंगी लढत होणार आहे. यामध्ये आमदार उल्हास पाटील, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सावकर मादनाईक व शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर या तीन नेत्यांना उदगावचा गड राखण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
उदगांव जिल्हा परिषदेसाठी अनुसूचित जाती महिला वर्गासाठी आरक्षित असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दीपाली जालिंदर ठोमके, राष्ट्रवादी-काँग्रेसकडून भारती हंकारे व पल्लवी कांबळे, तर शिवसेनेकडून स्वाती सासणे व सीमा हंकारे यांनी जोर लावला आहे. स्वाभिमानी व भाजपची युती न झाल्याने स्वाभिमानीने स्वबळावर नारा उचलला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन युती केली आहे. तर शिवसेना व भाजपमध्ये युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.
उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात ४२ हजारांहून अधिक मतदार असून, सर्वाधिक मतदार उदगावमध्ये असल्यामुळे निर्णायक ठरणार आहे. तर मौजे आगर, अर्जुनवाड, संभाजीपूर, चिंचवाड ही गावे तीन हजारांपर्यंत मतदार असलेली आहेत. तसेच हसूर, कनवाड, कुटवाड, घालवाडसह गावांचा समावेश असल्याने तीनही पक्षांना दमछाक करावी लागणार आहे.
उदगाव पंचायत समितीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून उमेश मडिवाळ, लाजम मुजावर, बाळासाहेब कोळी, तर शिवसेनेकडून डॉ. आदम नदाफ यांचे नाव आघाडीवर आहे. तर अर्जुनवाड पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरयू प्रमोद पाटील, तर शिवसेनेकडून राजश्री खाडे तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अलका मेडसिंगे, राजश्री चौगुले, नंदाताई खोत यांच्यासह
नावे आघाडीवर असली तरी माघारीनंतरच खरी लढत पाहावयास मिळणार आहे.


तीन नेत्यांची कसरत
उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात स्वाभिमानीचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सावकर मादनाईक यांनी दीपाली ठोमके यांना निवडून आणून आपला गड शाबूत ठेवण्याचा विडा उचलला आहे. तर शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर व दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांची काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये युती झाली असून, यांनाही ताकद लावावी लागणार आहे. तर उदगावमध्ये शिवसेना पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात असून, आमदार उल्हास पाटील यांना या निवडणुकीत कस लावावा लागणार आहे.

Web Title: The battle of three leaders in the Uda Nagar District Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.