बावड्याला वळिवाने झोडपले, कॉलन्यांत पाणी तुंबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:23 AM2021-05-08T04:23:41+5:302021-05-08T04:23:41+5:30
बावडा परिसरात शुक्रवारी सायंकाळी पावसाचे वातावरण झाले. त्यानंतर जोरदार वारेही सुटले होते. अचानक पावसाला सुरुवात झाली. या मुसळधार ...
बावडा परिसरात शुक्रवारी सायंकाळी पावसाचे वातावरण झाले. त्यानंतर जोरदार वारेही सुटले होते. अचानक पावसाला सुरुवात झाली. या मुसळधार पावसाने अक्षरशः काही वेळातच सर्वत्र पाणी पाणी करून टाकले. बावड्यातील उपनगरातही अनेक ठिकाणी पाणी साचून राहिले होते. यशवंत कॉलनी व आनंदस्वरूप पार्कात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने एखाद्या तळ्याचे स्वरूप या कॉलनीला आले होते. महापालिकेच्या आरोग्य विभागाने कॉलनीतील नाल्यांची नियमितपणे स्वच्छता केली असती तर कॉलनीत पाणी तुंबले नसते अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकातून उमटली. येथून पुढे तरी कॉलनीची नियमितपणे नालेसफाई व्हावी, अशी मागणी या निमित्ताने नागरिकातून होत होती.
दरम्यान, यापूर्वीही कसबा बावडा परिसरात तीन जोरदार मोठे वळीव पाऊस झाले होते. शुक्रवारीही जोरदार पाऊस झाल्याने नागरिक सुखावले. सायंकाळी पाचच्या सुमारास तासभर पाऊस पडला. पावसामुळे हवेत कमालीचा गारवा झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
फोटो : ०७ बावडा पाऊस
कसबा बावड्यात बुधवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे यशवंत कॉलनी, आनंद स्वरूप पार्कात पाणी तुंबले होते.