'बावनकुळेंनी नव्या नेमणुका रद्द करूनच कोल्हापुरात यावे', भाजपमध्ये नवा-जुना वाद पेटला 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 12:17 PM2023-10-03T12:17:08+5:302023-10-03T12:18:02+5:30

जुन्या कार्यकर्त्यांना ताकद दाखवावी लागेल

'Bawankules should come to Kolhapur only after canceling new appointments', a new-old dispute in BJP | 'बावनकुळेंनी नव्या नेमणुका रद्द करूनच कोल्हापुरात यावे', भाजपमध्ये नवा-जुना वाद पेटला 

'बावनकुळेंनी नव्या नेमणुका रद्द करूनच कोल्हापुरात यावे', भाजपमध्ये नवा-जुना वाद पेटला 

googlenewsNext

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत, त्यांनी पक्षांतर्गत नव्याने केलेल्या नेमणुका रद्द कराव्यात मगच येथे यावे, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते बाबा देसाई, आर. डी. पाटील, शिवाजी बुवा, पी. डी. पाटील आदींनी पत्रकातून केली आहे.

भाजपने कोल्हापूर जिल्ह्यातील पक्षांतर्गत नेमणुका केल्या आहेत. जुन्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता या निवडी जाहीर केल्या आहेत. पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंत अनेक कार्यकर्ते सत्ता असो व नसो तनमनधनाने भाजप कोल्हापुरात वाढवण्यासाठी राबले. अजूनही ही मंडळी काम करत आहेत. त्यांची काम करण्याची क्षमता असताना प्रत्येक ठिकाणी डावलले जाते. गेली तीन वर्षे हाच प्रकार सुरू असून, यात सुधारणा होणार नसेल तर पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांना ताकद दाखवावी लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: 'Bawankules should come to Kolhapur only after canceling new appointments', a new-old dispute in BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.