बावनकुळेंनी रात्रीचे मंत्रालय सुरू ठेवावे : सतेज पाटील यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 01:17 AM2018-02-23T01:17:24+5:302018-02-23T01:19:36+5:30

कोल्हापूर : शेतकऱ्यांना शेतीपंपांसाठी दिवसाऐवजी रात्रीची वीज देणाऱ्या ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रात्रीचे मंत्रालय सुरू ठेवावे, मगच त्यांना शेतकऱ्यांच्या वेदना कळतील, अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी येथे केली.

 Bawnkuleni should continue the night ministry: Satej Patil's criticism | बावनकुळेंनी रात्रीचे मंत्रालय सुरू ठेवावे : सतेज पाटील यांची टीका

बावनकुळेंनी रात्रीचे मंत्रालय सुरू ठेवावे : सतेज पाटील यांची टीका

googlenewsNext
ठळक मुद्दे शेतकऱ्यांचा ‘महावितरण’वर धडक मोर्चा; शेतीपंपांसाठी दिवसाला बारा तास वीज द्याहा अहवाल कॅबिनेट किंवा विधानसभा, विधानपरिषद येथे मांडणे आवश्यक होते

कोल्हापूर : शेतकऱ्यांना शेतीपंपांसाठी दिवसाऐवजी रात्रीची वीज देणाऱ्या ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रात्रीचे मंत्रालय सुरू ठेवावे, मगच त्यांना शेतकऱ्यांच्या वेदना कळतील, अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी येथे केली. त्याचबरोबर गेल्या तीन वर्षांत विजेसाठी एकही पैसा पश्चिम महाराष्टÑात न देता मुख्यमंत्र्यांनी तो विदर्भाकडे नेल्याचा टोलाही त्यांनी हाणला. सरकारने शेतीपंपांसाठी दिवसाला बारा तास वीज द्यावी; यासह विविध मागण्यांसाठी आ. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी ‘महावितरण’वर धडक मोर्चा काढला.

दुपारी बाराच्या सुमारास दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. हीनस कॉर्नर, स्टेशन रोड, दाभोळकर कॉर्नर, सासने मैदान, आदित्य कॉर्नरमार्गे मोर्चा ताराबाई पार्कातील ‘महावितरण’ कार्यालयावर नेण्यात आला. याठिकाणी महावितरण व सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

आ. सतेज पाटील म्हणाले, जिल्ह्णातील सुमारे सहा हजार शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून शेतीपंपासाठी वीजजोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. हे सरकार फसणवीस आणि घोषणाबाजांचे असून त्याबद्दल त्यांचा सत्कार केला पाहिजे. या सरकारमुळे एकही घटक सुखी नाही. विजेवर अवलंबून असणाºया घटकांचे कंबरडे मोडण्याचे काम सरकारने केले आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी रात्रीचे कार्यालय सुरू ठेवावे; मगच शेतकऱ्यांच्या अडचणी कळतील.

ते पुढे म्हणाले, मीटर रीडिंग व वीज बिलातील तक्रारींबाबत शासनाने कृषिपंप वीज वापर सत्यशोधन समिती स्थापन केली. तिच्या अहवालानंतर आयोग जो निर्णय घेईल त्याची अंमलबजावणी करण्याचे शपथपत्र ‘महावितरण’ने दिले. त्यानंतर हा अहवाल कॅबिनेट किंवा विधानसभा, विधानपरिषद येथे मांडणे आवश्यक होते; परंतु हा अहवाल अद्याप पटलावर येत नाही, यामागे काय गौडबंगाल आहे?

बाबासाहेब पाटील-भुयेकर, किरणसिंह पाटील, संजय पाटील, विश्वास नेजदार, केरबा पाटील, विद्याधर गुरबे, विक्रांत पाटील-किणीकर यांनी भावना व्यक्त केल्या.मोर्चात महापौर स्वाती यवलुजे, कर्णसिंह गायकवाड, मधुकर देसाई, जि. प. सदस्य बजरंग पाटील, भगवान पाटील, बंडा माने, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष अंजना रेडेकर, संध्या घोटणे, सत्यजित जाधव, प्रदीप झांबरे, तौफिक मुल्लाणी, शशिकांत पाटील-चुयेकर, मंगल कांबळे, पांडुरंग भोसले, शामराव देसाई, सचिन घोरपडे, सदाशिव चरापले,आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

पालकमंत्री नगरसेवक फोडण्यात मग्न
जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे नगरसेवक फोडण्यात मग्न आहेत. त्याचबरोबर पालकमंत्र्यांना विविध महोत्सव घ्यायला वेळ आहे; पण वीज आणि शेतकºयांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असा टोला आमदार पाटील यांनी लगावला.


सरकारला जाब विचारू
शेतीपंपांच्या प्रश्नावर २७ नोव्हेंबरला झालेल्या चर्चेनंतर लवकरच बैठक घेऊ, असे आश्वासन देणाºया मुख्यमंत्र्यांच्या तारखेची वाट अजून पाहतोय, असे सांगून हे सरकार फसवे असून, त्यांना जाब विचारण्याची वेळ आली असल्याचे विक्रांत पाटील यांनी सांगितले.


यांचे भांडण ‘खरे की खोटे’?
खासदार धनंजय महाडिक व आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता, ‘हे दोघे जवळचे पाहुणे असल्याने, ते खरोखर भांडतात की खोटे-खोटे भांडतात, हेच कळत नाही!’ अशी फिरकी भुयेकर-पाटील यांनी घेतल्यावर एकच हशा पिकला.

तक्रार अर्ज २ मार्चपर्यंत जमा करा
६००० शेतकºयांनी शेतीपंपासाठी वीजजोडणीकरिता अर्ज केले आहेत; परंतु त्यांना अद्यापही वीजजोडणी मिळालेली नाही. नियमानुसार अर्ज केल्यानंतर ठरावीक वेळेत वीजजोडणी देणे बंधनकारक असून महावितरणवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. त्यामुळे संबंधितांनी २ मार्चपर्यंत इरिगेशन फेडरेशन व ‘अजिंक्यतारा’ येथे तक्रार अर्ज द्यावेत, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.


एकाच युनिटचे वेगवेगळे बिल
सुभाषनगरातील एका ग्राहकाला १०८ युनिटला ६२५ रुपये वीज बिल आले आहे, तर त्याच्या शेजारी असणाºया ग्राहकाला १०८ युनिटला ६०८ रुपये बिल आले आहे. हा ‘महावितरण’च्या भोंगळ कारभाराचा अजब नमुना असल्याचे आमदार पाटील यांनी निदर्शनास आणले.

शेतीपंपासाठी दिवसा बारा तास वीज द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी ताराबाई पार्कातील ‘महावितरण’च्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

Web Title:  Bawnkuleni should continue the night ministry: Satej Patil's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.