ऑक्सिजन पुरवठ्याबाबत अलर्ट रहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:25 AM2021-05-11T04:25:52+5:302021-05-11T04:25:52+5:30
जिल्ह्यात सध्या अडीच हजारावर कोरोना रुग्ण ऑक्सिजनवर आहेत त्यामुळे जिल्ह्याला रोज ५० टन ऑक्सिजनची गरज आहे. त्यापैकी ४० टनापर्यंत ...
जिल्ह्यात सध्या अडीच हजारावर कोरोना रुग्ण ऑक्सिजनवर आहेत त्यामुळे जिल्ह्याला रोज ५० टन ऑक्सिजनची गरज आहे. त्यापैकी ४० टनापर्यंत सध्या पुरवठा केला जात आहे. हा पुरवठा रोजची गरज भागण्याएवढाच असल्याने जिल्हा प्रशासन त्यावर लक्ष ठेवून आहे. मागील आठ-दहा दिवसात ऑक्सिजन पुरवठा साखळीतून वितरकच गायब झाल्याने रुग्णालयांकडून थेट जिल्हा प्रशासनाकडेच ऑक्सिजनची मागणी केली जात होती.
याबाबत प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून रोज सायंकाळी वितरकांची बैठक घेतली जात आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत रुग्णालयांना ऑक्सिजन वेळेच्या आधी पुरवला जावा यासाठी वितरकांनी २४ तास अलर्ट रहावे, रुग्णालयांना जिल्हा प्रशासनाऐवजी थेट तुम्हाला संपर्क साधायला सांगून त्यांच्याशी समन्वय साधा अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके उपस्थित होते.
--