रुग्ण वाढू नयेत यासाठी काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:24 AM2021-04-21T04:24:48+5:302021-04-21T04:24:48+5:30
निपाणी नगरपालिका कार्यालयात आरोग्य विभाग, नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, तहसील प्रशासन या सर्व विभागांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. या ...
निपाणी नगरपालिका कार्यालयात आरोग्य विभाग, नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, तहसील प्रशासन या सर्व विभागांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. या बैठकीनंतर त्या बोलत होत्या. या बैठकीला नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्षा नीता बागडे, तहसीलदार प्रकाश गायकवाड, डीवायएसपी संतोष सत्यनाईक, गटशिक्षणाधिकारी रेवती मठद, तालुका वैद्य अधिकारी व्ही.व्ही. शिंदे, नगरपालिकेचे आयुक्त महावीर बोरणवर यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
मंत्री जोल्ले पुढे म्हणाल्या की, निपाणी शहर व ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत व निपाणीला पुन्हा एकदा लॉकडाऊन करावे लागू नये यासाठी नागरिकांनी सावध होणे गरजेचे आहे. निपाणी शहरात प्रत्येक प्रभागामध्ये लसीकरण करण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने नियोजन करण्यात यावे. लसीचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा नसून सर्वत्र पुरेशी आहे. सध्या ४५ वर्षांवरील सर्वांना लस दिली जात असून, येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस देण्यात येणार आहे. लसीबाबत असलेले गैरसमज दूर करून प्रत्येकाने लस घ्यावी, असे त्यांनी सांगितले. निपाणी तालुक्यात असलेल्या १२ रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १६ जणांचा अहवाल सध्या येणे बाकी आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर ही संख्या वाढणार की कमी होणार, हे लक्षात येणार आहे. निपाणीला सध्या २५ जंबो ऑक्सिजनची गरज असून, याची लवकरच पूर्तता करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी स्वागत केले. तालुका वैद्यकीय अधिकारी व्ही.व्ही. शिंदे यांनी तालुक्यात असलेल्या कोरोनाच्या सद्य:स्थितीची माहिती दिली. डॉक्टर बलराज जाधव यांनी लसीकरणाची माहिती दिली. या बैठकीस सर्व विभागाचे अधिकारी, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.