महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी सज्ज रहा : हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 09:12 PM2020-12-12T21:12:23+5:302020-12-12T21:15:01+5:30
Hasan Mushrif, Ncp, Kolhapurnews कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंंडा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कोल्हापूर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंंडा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाचे शनिवारी शाहू मार्केट यार्ड येथील कागल संघाच्या इमारतीत स्थलांतर झाले, त्यावेळ ते बोलत होते. यावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळकटीसाठी कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जाऊन काम करावे. कोल्हापूर महापालिकेत गेली पंधरा वर्षे आपण सत्तेत आहोत. त्यामुळे निवडणूक ताकदीने लढवायची आहे, त्यासाठी प्रभागनिहाय नियोजन करा.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे प्रभागात फिरत असल्याचे ऐकले. पदवीधर व शिक्षक मतदारसंघात जो निकाल लागला, त्या चटक्यातून सावरण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, के. पी. पाटील, अशोकराव जांभळे, आर. के. पोवार, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, राजेश लाटकर, रामराजे कुपेकर, जयकुमार शिंदे, आदी उपस्थित होते.