‘जिल्हा परिषदे’साठी सज्ज रहा

By admin | Published: June 11, 2015 12:43 AM2015-06-11T00:43:25+5:302015-06-11T00:43:56+5:30

बी. एन. पाटील : राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन कार्यक्रम

Be ready for the Zilla Parishad | ‘जिल्हा परिषदे’साठी सज्ज रहा

‘जिल्हा परिषदे’साठी सज्ज रहा

Next

कोल्हापूर : जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत व सक्षम करून आगामी जिल्हा परिषदेसह सर्वच पंचायत समित्यांवर पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सदस्य बी. एन. पाटील-मुगळीकर यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या १६ व्या वर्धापनदिनानिमित्त ताराबाई पार्क येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी ध्वजाचे अनावरण बी. एन. पाटील यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबूराव हजारे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.
स्वागत व प्रास्ताविकात जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे म्हणाले, स्वाभिमानातून १६ वर्षांपूर्वी पक्षाध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. हा स्वाभिमान बाळगून कार्यकर्त्यांनी आजपर्यंत वाटचाल केल्याने राष्ट्रवादी जिल्ह्यात नंबर वनचा पक्ष झाला आहे. पक्ष वाढीबरोबर केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या कारभाराविरोधात जनतेबरोबर राहण्याची जबाबदारीही आपल्यावर आली आहे. ही जबाबदारी कार्यकर्त्यांना उचलावी लागणार आहे. तसेच जनतेच्या विविध प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून त्यांना न्याय देण्याची भूमिका कार्यकर्त्यांना घ्यावी लागणार आहे.
जिल्हा बॅँकेचे संचालक भैया माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष धैर्यशील पाटील-कौलवकर, भूविकास बॅँकेचे माजी अध्यक्ष युवराज पाटील, महिला जिल्हाध्यक्षा संगीता खाडे, पंडितराव केणे, प्रकाश पाटील, नेताजी मोरे, डी. बी. पाटील,
प्रा. किसन चौगले, हंबीरराव पाटील, आप्पासाहेब धनवडे, प्रदीप पाटील, संतोष धुमाळ, पूनम मगदूम, एम. जे. पाटील, सुनील साळोखे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. माजी पंचायत समिती सदस्य मधुकर जांभळे यांनी आभार मानले. ( प्रतिनिधी )

Web Title: Be ready for the Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.