कोविड सेंटरमध्ये तरुणाने केले सहकारी वृद्धाचे दाढी, केस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:19 AM2021-06-04T04:19:14+5:302021-06-04T04:19:14+5:30
पट्टणकोडोली येथे ग्रामपंचायत अलगीकरण सेंटर चालू केले आहे. यामध्ये कोरोनाची बाधा झालेले महिलांसहित ३३ रुग्ण उपचार घेत आहेत. घरापासून ...
पट्टणकोडोली येथे ग्रामपंचायत अलगीकरण सेंटर चालू केले आहे. यामध्ये कोरोनाची बाधा झालेले महिलांसहित ३३ रुग्ण उपचार घेत आहेत. घरापासून नातेवाईकांपासून लांब राहायला या रुग्णांना लागत आहे. मात्र अशावेळी हे रुग्णच एकमेकांना मदत करत असल्याची प्रचिती येथे येत आहे. सर्वच रुग्णांच्यात एक प्रकारचे ऋणानुबंध निर्माण झाले आहेत. या सेंटरमध्ये दोन दिवसांपूर्वी पिरगोंडा पाटील हे वृद्ध दाखल झाले आहेत. तर अनिकेत खुडे हा सहा दिवसांपूर्वी दाखल झाला आहे. वृद्ध सेंटरमध्ये आल्यापासूनच त्यांची काळजी घेणे. त्यांना हाताला धरून फिरवणे. त्यांच्या जेवणाची विचारपूस करणे ही सर्व कामे अनिकेत खुडे हा तरुण करतो. या वृद्धाला आज एचआरसीटी चाचणीसाठी बाहेरील रुग्णालयात घेऊन जायचे होते. मात्र पिरगोंडा पाटील यांचे केस आणि दाढी खूपच वाढलेली होती. हे पाहून खुडे याने आज या वृद्धाची स्वत: मशिनच्या साहाय्याने दाढी करून केस कापले. त्यामुळे कोरोना सेंटरमधील रुग्ण आणि संयोजक यांच्यातून अनिकेत खुडे या तरुणाचे कौतुक होत आहे.
फोटो औळ : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायत आयसोलेशन कोविड सेंटरमध्ये तरुणाने एका वृद्धाचे दाढी करून केस कापले.