तुमच्या नवऱ्याचे भूत माझ्या पत्नीस लागल्याचे म्हणत बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:29 AM2021-08-25T04:29:34+5:302021-08-25T04:29:34+5:30

कोल्हापूर : तुझ्या नवऱ्याचे भूत माझ्या पत्नीला लागले आहे असे म्हणत एका महिलेस धक्काबुक्की करीत तिच्या मुलाला प्लास्टिक पाइपने ...

Beating that my husband's ghost is on my wife | तुमच्या नवऱ्याचे भूत माझ्या पत्नीस लागल्याचे म्हणत बेदम मारहाण

तुमच्या नवऱ्याचे भूत माझ्या पत्नीस लागल्याचे म्हणत बेदम मारहाण

Next

कोल्हापूर : तुझ्या नवऱ्याचे भूत माझ्या पत्नीला लागले आहे असे म्हणत एका महिलेस धक्काबुक्की करीत तिच्या मुलाला प्लास्टिक पाइपने बेदम मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार शिवाजी उद्यमनगरातील यादवनगर परिसरात घडला. आदित्य सुनील निपाणीकर (रा. राजर्षी शाहू वसाहत, शिवाजी उद्यमनगर), असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उद्यमनगरात किरकोळ कारणांवरून ज्योती सुनील निपाणीकर (वय ३७) यांच्या घरासमोर येऊन आकाश सुनील लाखे हा शिवीगाळ करीत होता. ‘तुमच्या नवऱ्याचे भूत माझ्या पत्नीस लागले आहे’, असे म्हणून तो अश्लील बोलत होता. त्यावेळी ज्योती या बाहेर येऊन त्यांनी शिवीगाळ का करता म्हणून जाब विचारला असता त्यांच्या केसाला धरून त्यांना मारहाण करण्यात आली. यावेळी त्यांचा मुलगा आदित्य निपाणीकर हा वाद सोडविण्यासाठी आला असता त्यालाही पकडून घराशेजारील विजेच्या लोखंडी खांबावर त्याचे तोंड आपटून जखमी केले. त्यानंतर त्यांना प्लास्टिकच्या जाड पाइपने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत आदित्य जखमी झाला. त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात ज्योती निपाणीकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आकाश सुनील लाखे, नागेश लाखे, पिंकी लाखे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Beating that my husband's ghost is on my wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.