शिवीगाळचा जाब विचारणाऱ्या दोघांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:29 AM2021-06-09T04:29:10+5:302021-06-09T04:29:10+5:30
कोल्हापूर : शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या दोघांना बांबूने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना गजानन महाराज नगरात घडली. या ...
कोल्हापूर : शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या दोघांना बांबूने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना गजानन महाराज नगरात घडली. या हल्ल्यात प्रसाद प्रकाश बारवाशे (वय ४१) व त्यांचा भाऊ सागर बारवाशे (३७, दोघेही रा. राजे हौसिंग सोसायटी, गजानन महाराज नगर, कोल्हापूर) हे जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री घडली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी प्रकाश बारवाशे व त्यांचा भाऊ सागर हे शिवीगाळ का करता यासाठी जाब विचारण्यास गेले असता दोघांनाही लाकडी बांबू, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये दोघेही जखमी झाले. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नागेश्री दादासाहेब कांबळे, प्रतीक दादासाहेब कांबळे, मनीष दीपक पाटील (सर्व रा. गजानन महाराज नगर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.